राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर मंदावल्याने धरणातील विसर्ग काहीसा कमी झाला आहे. काल गोदावरी नदी 15,775 क्युसेकने सुरु झाला. काल सकाळी 6 वाजेपर्यंत 1 जूनपासून नांदूर मधमेश्वर बांधर्यातून जायकवाडीच्या दिशेने 51.4 टीएमसी पाण्याचा विसर्ग गोदावरीत करण्यात आला आहे.
दोन दिवसांपासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा मंदावला आहे. भावली भाम या प्रकल्पातून दारणात पाणी दाखल होत असल्याने आणि दारणाच्या पाणलोटातील घाटमाथ्यावरील धबधबे वाहत असल्याने दारणात 24 तासात अर्धा टीएमसी पाणी नव्याने दाखल झाले. भावली प्रकल्पातून 382 आणि भाममधून 1,443 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. हे पाणी, तसेच घाटमाथ्यावरील पाणी दारणा धरणात दाखल होत असल्याने दारणातून 6,024 क्युसेक वेगाने पाणी निसर्गाच्या रूपात नांदूर मधमेश्वर बंधार्याकडे धावत आहे.
मुकणे धरणातून 363, वालदेवीतून 814, आळंदीतून 243 क्युसेकने विसर्ग केला जात आहे. गंगापूर धरणातून व समूहातून सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. कडवा धरणातून 1,176, पालखेडमधून 1,592, वाकीतून 396 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. खाली नांदूर मधमेश्वर बंधार्यातून 15,775 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. काल सकाळी 6 पर्यंत 1 जूनपासून 51.4 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
धरणातील साठे असे- दारणा 95.86 टक्के, मुकणे 98.04 टक्के, वाकी 92.17 टक्के, भाम, भावली, वालदेवी, आळंदी हे धरणं 100 टक्के भरली आहेत. गंगापूर 94.21 टक्के, कश्यापी 98.11 टक्के, गौतमी गोदावरी 97.11 टक्के, कडवा 90.17 टक्के, भोजापूर 90.51 टक्के, पालखेड 78.10 टक्के.




