Saturday, May 17, 2025
Homeनगरसोने पॉलिश करण्याचा बहाणाकरुन 4 तोळे दागिन्यांची चोरी

सोने पॉलिश करण्याचा बहाणाकरुन 4 तोळे दागिन्यांची चोरी

राहाता |वार्ताहर| Rahata

- Advertisement -

सोने पॉलिश करून देण्याचा बाहणा करत राहात्यातील पंधरा चारी परिसरात राहणार्‍या महिलांच्या गळ्यातील 4 तोळे सोने दोन भामट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. याबाबत अज्ञात दोन चोरट्यांविरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 चारी येथील राहणार्‍या अनिता रमेश आनप यांनी पोलिसात दिलेल्या फिर्याद म्हटले आहे, शुक्रवारी सकाळी 11 वाजेदरम्यान घरातील काम करत असताना दोन व्यक्ती आमच्या घरी मोटारसायकलवर आले व त्यांनी मला आम्ही उज्वला कंपनीमधून आलो आहे. आम्ही तुमच्या घरातील पितळेची भांडी, फर्निचर, टीव्ही व इतर वस्तू पॉलिश करून देतो असे म्हणत त्यांनी मला व माझ्या सुनेला एक कार्ड हातात दिले.

कार्ड हातात दिल्यानंतर आम्हा दोघींना भुरळ पडल्यासारखे झाले. आम्हाला भुरळ पडल्यानंतर त्यांनी आम्हाला घरातील पितळी भांडे तसेच फर्निचर व टीव्ही केमिकलने स्वच्छ करून दिली. आम्हा दोघींना भुरळ पडली असल्यामुळे ते जे सांगत होते ते आम्ही करत होतो. त्यांनी मला तुमच्या गळ्यातील सोने काढून द्या आम्ही पॉलिश करून देतो असे सांगितल्यानंतर मी व माझ्या सुनेने आमच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने त्यांच्याकडे काढून दिले. पोलीस करण्यासाठी काढून दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये सोन्याचे गंठण, कानातील साखळ्या व टॉप्स, रिंग, असे एकूण 4 तोळे सोने असे अंदाजे 2 लाख 50 हजार किमतीचे सोन्याचे ऐवज आम्हाला भुरळ पाडून चोरून निले असल्याची फिर्याद अनिता रमेश आनप यांनी राहाता पोलिसात दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नीरज चोप्राने ९०.२३ मीटर भाला फेकत केली नव्या विक्रमाची नोंद

0
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात ९०. २३ मीटर लांब...