Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रAshadhi Ekadashi 2023 : वारकऱ्यांसाठी आंनदाची बातमी! शासकीय महापूजेत विठ्ठल रुक्मिणीचे मुखदर्शन...

Ashadhi Ekadashi 2023 : वारकऱ्यांसाठी आंनदाची बातमी! शासकीय महापूजेत विठ्ठल रुक्मिणीचे मुखदर्शन होणार

पंढरपूर | Pandharpur

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2023) निमित्त पंढरपूर (Pandharpur) येथे श्री विठ्ठल-रुक्मीणी दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. यापुढे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा (Government Mahapuja) सुरु असताना विठ्ठलाचे मूखदर्शन (Shri Vitthal Rukimini Mandir Mukh Darshan) सुरु राहणार आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल (24 जून) एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने महत्त्वाचा निर्णय झाला. यापूर्वी शासकीय महापूजा सुरु होण्यापूर्वी मंदिर काही काळ बंद असायचे. त्यामुळे वारकरी आणि भक्तांना पांडुरंगाचे दर्शन मिळायचे नाही. मात्र, विद्यमान सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतल्याने भाविकांचा मूखदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वर्षांच्या परंपरेला छेद देत विठ्ठलभक्तांसाठी घेतलेल्या या निर्णयाच सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या निर्णयामुळे जवळपास दीड ते दोन लाख भाविकांना देवाचे मुखदर्शन घेता येणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचां दर्शन घेता यावं, यासाठी भाविक अनेक तास दर्शनाच्या रांगेत उभे असतात. त्याचवेळी व्हीआयपी मंडळी दर्शन घेण्यासाठी गर्दी करुन नंब लावतात. हे टाळण्यासाठी शिंदे सरकारने धाडसी निर्णय घेत आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा सुरु असतानाही सामान्य भाविकांना मुखदर्शन सुरु ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

वैजापुरात सापडले तब्बल दिडशे वर्षांपूर्वीचे मानवी अवशेष

आषाढी एकादशी महापूजा हा पंढरपूर येथे पार पडणारा एक महत्त्वाचा शासकीय कार्यक्रम आहे. आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री विठ्ठल रखुमाईची सपत्नीक महापूजा करतात. आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये वैष्णवांचा मेळा भरलेला असतो. त्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून आणि इतर प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतात. पूजेचे मुख्य केंद्र पंढरपूरचे विठोबा मंदिर आहे, जे महाराष्ट्रातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी विविध शहरे आणि गावांमधून दिंड्या येतात. दिंडीत भजन, कीर्तन, अभंग गायले जातात आणि विठोबाला समर्पित संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या (पालखी) वाहून नेण्यात येतात.

“नवाब शरीफ यांचा केक कापायला आम्ही…”; फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचं प्रत्युत्तर

- Advertisment -

ताज्या बातम्या