Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशआनंदाची बातमी! अंदमानात Monsoon दाखल, महाराष्ट्रात कधी?

आनंदाची बातमी! अंदमानात Monsoon दाखल, महाराष्ट्रात कधी?

मुंबई । Mumbai

प्रत्येक हंगामात लक्ष लागून राहात असलेला मान्सून (Monsoon) अखेर अंदमानात (Andaman Sea) दाखल झाला आहे. हवामान खात्याकडून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

आज सकाळपासून मान्सूनने अंदमानात हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये ढग दाटून आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून अंदमानात २२ मे रोजी दाखल होणार होता. मात्र यंदा हा मान्सून ६ दिवस आधीच म्हणजे १६ मे रोजी दाखल झाला आहे.

हवमान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदा केरळमध्ये मान्सून २७ मे रोजी दाखल होण्याची दाट शक्यता आहे. पुढील ५ दिवस अंदमान आणि केरळमधील नजिकच्या शहरांमध्ये मुसळधार पाऊस होईल.

दरम्यान पुणे वेधशाळेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहिती नुसार, महाराष्ट्रात किंवा मुंबईत मान्सून कधी येईल हे अद्याप सांगता येणार नाही. मात्र देश पातळीवर एकूण मान्सूनचा विचार केल्यास सरासरीच्या ९९ टक्के पाऊस असेल असा अंदाज दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या