Thursday, February 19, 2026
Homeमुख्य बातम्याSundar Pichai : गुगलचा एआय धमाका; भारतात १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Sundar Pichai : गुगलचा एआय धमाका; भारतात १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

नवी दिल्ली | New Delhi

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी भारतात (India) आगामी पाच वर्षांत १५ अब्ज डॉलर्स (सुमारे १,३६० अब्ज रुपये) गुंतवणुकीची (investment) मोठी घोषणा केली आहे. एआय इम्पॅक्ट समिटमध्ये बोलताना पिचाई यांनी स्पष्ट केले की, भारत हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर असून, गुगल या प्रवासात महत्त्वाचा भागीदार असेल.

- Advertisement -

या गुंतवणुकीचा सर्वात मोठा भाग आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे खर्च केला जाणार आहे. येथे देशातील पहिले भव्य
एआय डेटा सेंटर उभारले जाईल, जे भारताच्या एआय इकोसिस्टिमचा (AI ​​Ecosystem) कणा ठरेल. तसेच, भारत आणि अमेरिका यांच्यातील एआय संपर्क अधिक वेगवान करण्यासाठी समुद्रामधून इंडिया-अमेरिका कनेक्ट ही विशेष सबसी केबल टाकली जाणार आहे.

YouTube video player

संशोधनाला मोठी मदत

वैज्ञानिक संशोधनासाठी गुगलने ३ कोटी डॉलर्सचा ‘एआय फॉर सायन्स इम्पॅक्ट चॅलेंज’ जाहीर केला आहे. भारतातूनच जगातील पुढचा एआय दिग्गज बाहेर पडेल, असा विश्वास सुंदर पिचाई यांनी व्यक्त केला.

शिक्षण आणि सरकारी सेवेत क्रांती

सरकारी कर्मचारी : ८०० जिल्ह्यांमधील सुमारे २ कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना गुगल क्लाऊड प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जाईल.

शालेय शिक्षण : अटल टिंकरिंग लॅब्सच्या माध्यमातून १०,००० शाळांमधील १.१ कोटी विद्यार्थ्यांना एआय, रोबोटिक्स आणि कोडिंगचे धडे दिले जातील.

एआय सर्टिफिकेट : विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी हिंदी व इंग्रजी भाषेत गुगल एआय प्रोफेशनल सर्टिफिकेट प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे.

गलगोटिया विद्यापीठाला एआय समिटमधून बाहेर

प्रतिष्ठित ग्लोबल इंडिया एआय समिटमध्ये केंद्र सरकारने गलगोटिया विद्यापीठावर मोठी कारवाई केली आहे. एका रोबोटिक डॉगच्या प्रदर्शनावरून निर्माण झालेल्या वादानंतर विद्यापीठाला या समिटमधून तत्काळ बाहेर काढण्यात आले आहे. चिनी बनावटीचा रोबोट स्वतःचा असल्याचे भासवून सरकार आणि तंत्रज्ञान क्षेत्राची दिशाभूल केल्याचा आरोप विद्यापीठावर ठेवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : हृदयद्रावक! भिंत कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

0
सातपूर | प्रतिनिधी | Satpur नाशिक शहरातील सातपूर कॉलनी परिसरात (Satpur Coloney Area) अत्यंत दुर्दैवी घटना घडली. सातपूर कॉलनीतील कामगार कल्याण मंडळाच्या जवळच असलेल्या एका...