Wednesday, February 18, 2026
Homeक्राईमAhilyanagar : गोपाळपूरमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

Ahilyanagar : गोपाळपूरमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

शवविच्छेदन टाळण्याचा प्रयत्न उघड || पोलिसांकडून तपास सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नेवासा तालुक्यातील गोपाळपूर येथे 32 वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वंदना संतोष वडागळे असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, मृतदेहाचे शवविच्छेदन न करताच अंत्यविधी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, नेवासा पोलिसांनी हस्तक्षेप करत शवविच्छेदन केले आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

वंदना व तिचा पती संतोष वडागळे हे दोन मुलांसह गोपाळपूर येथे राहत होते. सोमवारी (16 फेब्रुवारी) संतोषने पत्नी वंदनाला नेवासा फाटा येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले. अशा परिस्थितीत शवविच्छेदन आवश्यक असतानाही संतोषने मृतदेह थेट गावात नेऊन अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती. या हालचालीची माहिती नेवासा पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. अंत्यविधीपूर्वीच मृतदेहाचे अहिल्यानगर जिल्हा शासकीय रूग्णालय येथे मंगळवारी (17 फेब्रुवारी) सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले.

YouTube video player

या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत वंदना हिच्या नातेवाईकांनीही गंभीर आरोप केले असून मृत्यूबाबत संशय अधिक गडद झाला आहे. पोलीस निरीक्षक पाटील यांनी पथकासह घटनास्थळी भेट देत संतोष वडागळे, नातेवाईक आणि ग्रामस्थांची चौकशी केली. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अंगावरील मारहाणीच्या खुणा आणि अंत्यविधीसाठी करण्यात आलेली घाई यामुळे हा मृत्यू नैसर्गिक नसून संशयास्पद असल्याची चर्चा गावात रंगली आहे. आता सर्वांचे लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे लागले आहे.

ताज्या बातम्या

AMC : मनपातील स्वीकृत नगरसेवकांवर 26 फेब्रुवारीला शिक्कामोर्तब

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेत आता महापौर व उपमहापौर हे दोन मुख्य पदाधिकारी निवडल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक पदांवर कोणाची वर्णी लागते, याची ओढ लागली आहे....