Thursday, October 8, 2026
Homeक्राईमCrime News : खून करून प्रेत गोणीत टाकून दरीत फेकले

Crime News : खून करून प्रेत गोणीत टाकून दरीत फेकले

वांबोरी घाटात अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

वांबोरी घाटामध्ये डोंगरगण (ता. अहिल्यानगर) शिवारात वन विभागाच्या हद्दीत एका अज्ञात पुरूषाचा मृतदेह दोन गोणीत टाकून दरीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर व्यक्तीची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह या ठिकाणी आणून टाकल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर तांदळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

वांबोरी घाटात दरीतील झुडपामध्ये गोणीत मृतदेह असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मंगळवारी (17 फेब्रुवारी) सकाळी मिळाली. माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, सहायक निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीम, रूग्णवाहिकेला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. गोणीसह मृतदेह ताब्यात घेऊन तो रूग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले आहे. 35 ते 40 वर्षीय अनोळखी पुरूषाचा तो मृतदेह असून त्याचा खून झाला असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सदर व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह या ठिकाणी आणून टाकल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यादृष्टीकोनातून तपास सुरू केला आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. त्याचा खून कोणत्या कारणातून झाला, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. वांबोरी घाट हा नेहमीच वर्दळीचा रस्ता असल्याने ही माहिती वार्‍यासारखी पसरली. बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. संबंधित वर्णनाचा इसम कोणाच्या ओळखीचा असल्यास किंवा कोणाला त्याबाबत माहिती असल्यास त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : जादा परतावा अन् व्यवसायाचे आमिष; एकाच दिवसात...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik झटपट श्रीमंत होण्याच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत सायबर चाेरट्यांनी शहरात आपले जाळे घट्ट केले आहे. शेअर मार्केटमधील भरघोस परतावा, ऑनलाईन टास्कच्या...