नवी दिल्ली | New Delhi
केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान, संसदेचे विशेष अधिवेशन (Special Session Of Parliament)बोलावले आहे. या विशेष अधिवेशनापूर्वी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Prahlad Joshi) यांनी १७ सप्टेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सर्वपक्षीय बैठकीत विशेष सत्राच्या अजेंड्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
प्रल्हाद जोशी यांनी ट्विटर पोस्ट करुन लिहिले आहे की, “या महिन्याच्या १८ तारखेपासून संसदेच्या विशेष सत्राच्या आधी १७ सप्टेंबरला संध्याकाळी साडेचार वाजता सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. यासाठी संबंधित नेत्यांना ई-मेलच्या माध्यमातून निमंत्रण पाठवण्यात आले आहे.”
संसदेच्या विशेष अधिवेशनासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या घरीही महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत विशेष अधिवेशनातील अजेंड्याबाबत चर्चा होऊ शकते. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, अनुराग ठाकूर, अश्वनी वैष्णव यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री सामील आहेत.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज ट्विटरवर पोस्ट करुन लिहिले की, ‘ संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन पाच दिवसांनी सुरु होणार आहे. एक व्यक्ती वगळता (कदाचित दुसराही) कोणालाही अजेंड्याबाबत माहित नाही. याआधी जेव्हा जेव्हा विशेष अधिवेशन किंवा विशेष बैठक आयोजित केल्या, तेव्हा अजेंडा आधीच माहित असायचा.




