Monday, August 17, 2026
Homeमुख्य बातम्याविरोधकांनी महिलांचा अधिकार हिसकावला - पंतप्रधान नरेंद्र मोदी

विरोधकांनी महिलांचा अधिकार हिसकावला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला जनतेशी संवाद

दिल्ली |

- Advertisement -

देशातील महिला शक्तीचे उडान विरोधकांकडून थांबविण्यात आले असून आमचे अथक प्रयत्न करून सुद्धा महिला आरक्षणात बदल होऊ शकला नाही. विरोधकांनी महिलांचा अधिकार हिसकावला असून नारी शक्ती वंदन अधिनियमात संशोधन होऊ शकले नाही त्या बद्दल सर्व माता भगिनींचे क्षमा मागतो’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दरम्यान काल महिला आरक्षणाबाबत विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्या नंतर आज पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधला.

काँग्रेस, डीएमके, टीएमसी, समाजदी पार्टी पक्षांच्या स्वार्थी राजकारणाने देशातील महिलांचे नुकसान केले आहे. महिला आरक्षणाचा प्रस्ताव नामंजूर झाल्याने मला सुद्धा दुख झाले. विरोधी पक्षातील बाकावरील सभासदांनी बाक वाजविली, आनंदोत्सव साजरा केला असे प्रकार महिला शक्तीच्या स्वाभिमान व आत्मसन्मानाला जखम आहे. महिला आरक्षणाला विरोध म्हणजे विरोधी पक्षाने संविधान बनविणाऱ्या‍ंचा अपमान केला आहे. आरक्षण विरोधी भूमिकेची शिक्षा विरोधकांना जरूर मिळणार असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हण्टले आहे.

ज्यांनी विरोध केला ते महिला शक्तीला ते कमजोर समजत आहे, प्रत्येक राज्यातील महिला शक्तीच्या वृद्धीचा समान प्रयत्न होता. राज्य छोटे असो वा मोठे महिला शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधी पक्षाने त्याची हत्या केली आहे, माहिला आरक्षण च्या विरोधातील अपराधी आहेत. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हण्टले आहे काँग्रेसने नेहमी महिला आरक्षणावर विरोध दर्शविला आहे. नेहमी महिला आरक्षण थांविण्याचा प्रयत्न केला. नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने देशाला आरक्षणाबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. कॉंग्रेसने महिला आरक्षणा विरोधी त्यांचा मुखवटा उघड केला आहे. विधेयक जरी नामंजूर झाले तरी आम्ही हारणार नाही, महिला आरक्षणाचा संकल्प आम्ही पूर्ण करूच असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसोबत संवाद साधताना म्हण्टले आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...