Thursday, January 8, 2026
Homeनगरशासकीय कार्यालय परिसरात निवडणूक प्रचारास बंदी

शासकीय कार्यालय परिसरात निवडणूक प्रचारास बंदी

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश || पक्षाचे बोधचिन्ह लावण्यासही निर्बंध

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी निवडणूक कालावधीत शासकीय कार्यालयांच्या परिसरात निवडणूक प्रचार करण्यास बंदी असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. दरम्यान, पूर्व परवानगी शिवाय पक्षाचे बोधचिन्ह लावण्यासही निर्बंध घालण्यात आले असल्याचे आदेश काढण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, सर्व शासकीय व निमशासकीय विश्रामगृहांच्या आवारामध्ये 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी, हितचिंतकांनी सभा घेणे, रॅली काढणे, निवडणुकीसंदर्भात पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्प्लेटस, कटआऊटस किंवा जाहिरात फलक लावणे, निवडणुक विषयक घोषवाक्य लिहिणे, या आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे, मतदारांना प्रलोभन दाखविणे, निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे, राजकीय कामासाठी सदर आवाराचा वापर करणे इत्यादी बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करणार्‍याविरूध्द भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 प्रमाणे कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

निवडणूक कालावधीत खासगी वाहनावर सक्षम प्राधिकारणाच्या पूर्व परवानगी शिवाय पक्षाचे बोधचिन्ह लावण्यास निर्बंधाचे आदेश निर्गमित केले आहेत. जिल्ह्यात सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगी शिवाय ऑटोरिक्षा, टेम्पो, दुचाकी व इतर खाजगी वाहनांवर पक्षाचे बोधचिन्ह, झेंडे व इतर घोषवाक्य लिहीणे इत्यादींवर या आदेशान्वये निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निवडणूक कालावधीत मतदान केंद्रांच्या 200 मीटर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. निवडणूक कालावधीत निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंधाचे आदेश निर्गमित केले आहेत.

YouTube video player

ध्वनीक्षेपकाचा वापर संबंधित पोलीस विभागाच्या परवानगी शिवाय करता येणार नाही. रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत कोणत्याही क्षेत्रात तसेच फिरत्या वाहनांवर ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व राजकिय पक्ष, उमदेवार व इतर व्यक्ती यांनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा वापर करावा. आदेशाचा भंग करण्यार्‍यांविरूध्द भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 प्रमाणे कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन; वयाच्या ८३...

0
मुंबई | Mumbai ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ (Madhav Gadgil) यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी पुण्यातील डॉ....