नाशिक। प्रतिनिधी Nashik
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् हे उद्या ७ फेब्रुवारी २०२५, शुक्रवार रोजी नाशिक जिल्हा दाैऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत पंचवटीतील रामकुंड येथे राष्ट्रजीवन पुरस्काराचे वितरण झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता गाेदाआरती करण्यात येणार आहे. त्यासाठी शहर पाेलीस आयुक्तालयाने चाेख बंदाेबस्ताचे नियाेजन केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
उद्या शुक्रवारी दुपारी बारा ते रात्री अकरा वाजेपर्यंत ढिकले वाचनालय ते रामकुंड या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद असणार असून हा रामकुंड परिसर ‘नाे व्हेईकल झाेन’ असणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पाेलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली.
दाेन्ही प्रमुख कार्यक्रमासाठी माेठी गर्दी हाेणार असल्याने पाेलीस आयुक्तालयायह वाहतूक विभागाने बंदाेबस्त आणि वाहतूकीचे काटेकाेर नियाेजन केले आहे.
पाेलीस आयुक्त संदीप कर्णिक, पाेलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त संदीप मिटके, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या सूचनेने वरिष्ठ अधिकारी व गुन्हेशाखेसह विविध पथकांचा चाेख बंदाेबस्त असणार आहे.
विशेष म्हणजे रामकुंड भागातील वाहतूक काेंडी टाळण्यासाठी दुपारी बारा ते रात्री अकरा वाजेपर्यंत या मार्गावर नाे व्हेईकल झाेन घाेषित करण्यात आला आहे.
हे मार्ग असणार बंद
-ढिकले वाचनालय ते रामकुंड या दाेन्ही मार्गावर सर्वच वाहनांना ‘प्रवेश बंद’
-मालेगांव स्टॅण्ड ते रामकुंड या मार्गावरही ‘प्रवेश बंद’
-सरदार चौक ते रामकुंड हा मार्गही वाहतूकीस बंद
वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.