Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उद्या नाशिक दौऱ्यावर

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उद्या नाशिक दौऱ्यावर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 24 वा दीक्षांत समारंभ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 30 वा दीक्षांत सोहळा उद्या सोमवारी, (दि. 24) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखील साजरा होणार आहे.

- Advertisement -

या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंंत्री हसन मुश्रीफ तसेच नवी दिल्ली येथील राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. बी. एन. गंंगाधर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. दीक्षांत समारंभाचे आयोजन विद्यापीठ आवारातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सकाळी साडेनऊ वाजता विद्यापीठ आवारात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. अशोक कोळस्कर हे स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करणार आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे व प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या या सोहळ्यासाठी ऑनलाईन नोंदणी केलेले स्नातक उपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...