Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रनार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची मंजुरी

नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची मंजुरी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ट्विट करत माहिती

मुंबई | Mumbai

उत्तर महाराष्ट्रातील (Uttar Maharashtra) अतिशय महत्त्वाचा व गेल्या ५० ते ६० वर्षापासून चर्चत व प्रतिक्षेत असलेला नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे. तशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्विट करत देण्यात आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन

फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले की, वैनगंगा-नळगंगा पाठोपाठ आता नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला सुद्धा मा.राज्यपाल महोदयांनी मंजुरी दिली आहे. मी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा अतिशय मनापासून आभारी आहे.या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून १०.६४ टीएमसी पाणीवापर प्रस्तावित असून त्याचा लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ४९,५१६ हेक्टर क्षेत्राला होणार आहे.

दरम्यान, सुमारे ७०१५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच या योजनेमध्ये ९ धरणे प्रस्तावित आहेत. त्यातून २६०.३० दलघमी पाणी ऊर्ध्वगामी नलिकेद्वारे उपसा करुन चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्याचे प्रस्तावित असून पुढे ७९.९२ कि.मी. लांबीच्या प्रवाही बंद नलिकेद्वारे सिंचन करणे प्रस्तावित आहे. त्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा, मालेगाव व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पारोळा, भडगाव तालुक्यांतील एकूण ४९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्राला मिळणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या