Tuesday, May 7, 2024
HomeUncategorizedफादर्स 'डे' विशेष : माझे वडील माझ्या जीवनाचे शिल्पकार

फादर्स ‘डे’ विशेष : माझे वडील माझ्या जीवनाचे शिल्पकार

प्रत्येक आई-वडिलांचा आपल्या मुलांच्या जडणघडणीमध्ये फार मोठा सहभाग असतो. त्याचप्रमाणे माझ्या व्यक्तीगत जिवनाचे शिल्पकार म्हणजे माझे वडील कै. पंढरीनाथ तुकाराम शिंदे.

शालेय जिवनापासून ते कृषी पदव्युत्तर शिक्षण, विविध स्पर्धा परीक्षांमधील सहभाग ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून सरळ सेवेने तहसीलदार या संवर्गात निवड अशा माझ्या जिवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अखंडपणे एखाद्या तेजोमय नंदादीपप्रमाणे माझ्या वडिलांचा थेट सहभाग होता. अतिशय दुष्काळी भागातील एकत्रित मोठ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडणारा एक अल्पशिक्षित परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा एक सर्वसामान्य शेतकरी.

- Advertisement -

स्वतःच्या इच्छाशक्तीच्या, त्यागाच्या व समर्पणाच्या आधारावर आपल्या मुलांकडून कुठलीही संसधाने, संपत्ती नसताना उच्च प्रतिच्या गुणवत्तेच्या जोरावर असामान्य कामगिरी करून घेणारे कुशल कारागीर म्हणून नेहमीच मी माझ्या कुटुंबाकडे पहात आलो आहे. त्यांच्या रुपाने सर्वांगसुंदर गुरु मला लाभला हे मी माझे भाग्य समजतो व आज फादर्स डे निमित्ताने त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो.

– गोविंद पंढरीनाथ शिंदे, उपविभागीय अधिकारी शिर्डी उपविभाग.

- Advertisment -

ताज्या बातम्या