Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशपहिल्या टप्यात 50 लाख लस ? कोणाला मिळणार या लसी

पहिल्या टप्यात 50 लाख लस ? कोणाला मिळणार या लसी

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजाकसत्ताक दिन तीन करोना लसीची तयारी अंतिम टप्यात असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर भारतात करोना लसीची चर्चा सुरु झाली.Govt eyes 50 lakh doses of corona vaccine in first stage

- Advertisement -

दिलासादायक! भारताने बनवली करोना प्रतिबंधक – कोव्हॅक्सीन लस

भारत सरकारकडूनही पहिल्या टप्प्यात ५० लाख करोना लस (Covid-19 vaccine) खरेदी करण्यासंबंधी चर्चा सुरु आहे. या लसीचा पहिला मान करोना योद्धा, भारतीय सैन्य आणि विशिष्ट श्रेणीतील लोकांना दिला जाणार आहे.

करोना लस अंतिम टप्यात असल्याने केंद्र सरकारने आता संपूर्ण लक्ष लसीच्या पुरवठा साखळी आणि वितरणावर केंद्रीत केले आहे. वर्षाअखेर करोना लस उपलब्ध होईल आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी, यासाठी आराखडा तयार केला जात आहे. नुकतीच करोना लस विकसित करणाऱ्या कंपन्यांसोबत झालेल्या बैठकीत नीती आयोग सदस्य व्ही के पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखालील बैठक झाली. त्यात लसीचे उत्पादन किती करता येईल, त्याची किमत यावर चर्चा झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या