Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशआता गाडीच्या नंबरपुढे येणार BH अक्षरे; जाणून घ्या, काय आहे 'BH SERIES'?

आता गाडीच्या नंबरपुढे येणार BH अक्षरे; जाणून घ्या, काय आहे ‘BH SERIES’?

दिल्ली | Delhi

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) वाहनाच्या क्रमांकाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. वाहनाच्या सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

वाहनांचे हस्तांतरण सुलभ होण्यासाठी केंद्र सरकारने (Central Govt) हि नवीन सुविधा सुरू केली आहे. त्यासाठी वाहन मालकांना भारत सिरीज (Bharat series) किंवा बीएच सिरीजमध्ये (BH-series) वाहनांची नोंदणी करावी लागणार आहे. याबाबतचे परिपत्रक केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने (MRTH) आज काढले आहे.

नवीन वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बीएच नोंदणीचा पर्याय मिळणार आहे. ज्या लोकांच्या नोकरीनिमित्त राज्ये बदलावी लागतात, त्यांना बीएच नोंदणीचा चांगला पर्याय असणार आहे. जर बीएच नोंदणीमध्ये वाहनाची नोंदणी केली तर दुसऱ्या राज्यात जाताना वाहन मालकांना नव्याने नोंदणी करावी लागणार नाही. यापूर्वी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहण्यासाठी गेलेल्या वाहन मालकांना वाहनांची नव्याने नोंदणी करावी लागत होती. नवीन सीरीज जुन्या वाहनांना लागू होणार नसली तरी देखील नवीन वाहने घेणाऱ्या लोकांसाठी फायद्याची ठरणार आहे.

कोणाला मिळणार ही सुविधा…

डिफेन्स, केंद्र, राज्य सरकारी कर्मचारी, खासगी कंपन्या ज्यांची कार्यालये 4 किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये आहेत.

BH रजिस्ट्रेशन अशा प्रकारे दिसेल

BH रजिस्ट्रेशनचा फॉर्मेट YY BH 5529 XX YY असा ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये पहिल्या रजिस्ट्रेशनचे वर्ष BH – भारत सीरीज कोड 4 – 0000 ते 9999 XX अल्फाबेट्स (AA ते ZZ).

- Advertisment -

ताज्या बातम्या