Thursday, May 2, 2024
Homeनाशिकबागलाण तालुक्यात इच्छुकांची मोर्चेबांधणी

बागलाण तालुक्यात इच्छुकांची मोर्चेबांधणी

सटाणा । प्रतिनिधी Satana

बागलाण तालुक्यातील एकुण 40 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी इच्छुकांतर्फे मोर्चेबांधणी करण्यास प्रारंभ झाला आहे. अर्ज दाखल करण्याच्या आज (दि. 30) अंतीम मुदतीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

तालुक्यात लखमापूर, ब्राम्हणगाव, ताहाराबाद, नामपूर, अंबासन, ठेंगोडा, वाडीपिसोळ, यशवंतनगर, देवळाणे, धांद्री, सोमपूर, बिजोटे, उत्राणे, करंजाड, श्रीपुरवडे, कोटबेल, लाडूद, सारदे, नळकस, मोराणे सांडस, दर्‍हाणे, पिंपळदर, कंधाणे, कुपखेडा, शेवरे, औंदाणेपाडा-कौतीकपाडे, इजमाने, बोढरी, निताणे, तरसाळी, नवीशेमळी, कोळीपाडा, रामतीर, दरेगाव, द्याने, जुनीशेमळी, खमताणे, रातीर, मळगावभामेर, विंचुरे आदी ग्रामपंचायतींसाठी इच्छूक उमेदवारांतर्फे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येत आहे.

बुधवार दि. 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत असल्यामुळे शेवटच्या दिवसात आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव व प्रत्यक्ष प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी इच्छुकांतर्फे धावपळ करण्यात येत आहे. काही ठिकाणी महिलांचे आरक्षण असल्यामुळे प्रबळ दावेदारांनी स्वत:ची राजकीय महत्वकांक्षा पुर्ण करण्यासाठी घरातील कारभारणीला निवडणुकीची संधी दिली आहे. 31 डिसेंबररोजी छाननी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर 4 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीची मुदत देण्यात आली आहे.

माघारीनंतर तात्काळ चिन्ह वाटप व अंतीम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. दि. 15 जानेवारीरोजी मतदान व 18 जानेवारीरोजी मतमोजणी करण्यात येणार असल्याचे संबंधित सुत्रांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे तयारी करण्यात येत आहे. करोना संसर्गाच्या प्रादुर्भावानंतर होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावातील वातावरण ढवळून निघाले आहे. नवीन वर्षात या निवडणुकीतून नवोदितांना संधी प्राप्त होते की प्रस्थापित आपली शक्ती पणाला लावून स्वत:ला सिध्द करतात, त्यासोबत किती ग्रामपंचायती बिनविरोध होतात याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या