Thursday, May 9, 2024
Homeनगरजलपुनर्भरण करणार्‍या ग्रामपंचायतींचा गौरव होणार

जलपुनर्भरण करणार्‍या ग्रामपंचायतींचा गौरव होणार

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

ज्या ग्रामपंचायती छतावरील पाण्याचे संकलन, विहीर पुनर्भरण, विंधन विहीर पुनर्भरण याबाबतीत चांगले काम करतील अशा ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येणार आहे.

- Advertisement -

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अटल भूजल योजना राज्यस्तरीय शिखर समितीची बैठक 17 जून रोजी मंत्रालयात झाली.

कृषी मंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, कृषी, मृद व जलसंधारण विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील भूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ बनली पाहिजे असा आशावाद पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

पाणी व्यवस्थापन आराखड्याला गती द्यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.ज्या ग्रामपंचायती छतावरील पाण्याचे संकलन, विहीर पुनर्भरण, विंधन विहीर पुनर्भरण याबाबतीत चांगले काम करतील अशा ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येईल अशी माहितीही मंत्री श्री.पाटील यांनी दिली.

या बैठकीत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अटल भूजल योजनेचे सादरीकरण केले. राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये 38 तालुक्यांत 1 हजार 1339 ग्रामपंचायतींमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.

स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे – कृषीमंत्री दादाजी भुसे

गाव पातळीवर भूजल पुनर्भरणाच्या योजना राबविताना अभिसरण महत्त्वाचे आहे. या योजनेला महात्मा गांधी नरेगा, पाणी फाऊंडेशन व अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गती द्यावी अशी सूचना कृषिमंत्री तथा अटल भूजल योजना राज्यस्तरीय शिखर समितीचे सदस्य दादाजी भुसे यांनी केली. अटल भूजल योजनेत समाविष्ट गावांना ठिबक व तुषार अंमलबजावणीत प्राधान्य देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या