Friday, May 3, 2024
Homeराजकीयग्रामपंचायत निवडणुकीसाठी निरीक्षक अन् समन्वयक अधिकार्‍यांची नियुक्ती

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निरीक्षक अन् समन्वयक अधिकार्‍यांची नियुक्ती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आगामी जानेवारी महिन्यात होणार्‍या पंचायत निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाच्या

- Advertisement -

निर्देशानुसार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. याचसोबत जिल्हानिहाय समन्वयक अधिकारी यांची देखील नेमणूक त्यांनी केली आहे.

जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील 767 ग्रामपंचातीसाठी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही अन्य निवडणुकांपेक्षा अवघड निवडणूक असल्याने ही निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विभागीय आयुक्तांना सूचना देऊन वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या तालुकानिहाय समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्या आहेत.

यात संगमनेर-अकोले तालुक्यासाठी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, नगरसाठी येवल्याचे उपविभागीय अधिकारी सोपान कासार, कोपरगाव- राहात्यासाठी निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, पारनेर-श्रीगोंद्यासाठी चांदवडचे उपविभागीय अधिकारी संदीप आहेर, पाथर्डी- शेवगावसाठी बागलाणचे उपविभागीय अधिकारी विजयकुमार भांगरे, कर्जत-जामखेडसाठी नाशिक भूसंपादन उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, नेवाशासाठी नाशिकचे रोहयोचे (पान 4 वर)

- Advertisment -

ताज्या बातम्या