Thursday, May 2, 2024
Homeनगरतिसर्‍या दिवशी सरपंचपदासाठी 3 तर सदस्यांसाठी 19 अर्ज दाखल

तिसर्‍या दिवशी सरपंचपदासाठी 3 तर सदस्यांसाठी 19 अर्ज दाखल

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह 125 सदस्यांकरिता 18 डिसेंबरला होत असलेल्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या कालच्या तिसर्‍या दिवशी सरपंचपदासाठी 3 तर सदस्यपदासाठी 19 अर्ज दाखल झाल्याने तिसर्‍या दिवसअखेर सरपंचपदासाठी दाखल अर्जांची संख्या 5 तर सदस्यपदासाठीच्या अर्जांची संख्या 28 झाली आहे. अर्ज भरण्यासाठी आज गुरुवार व उद्या शुक्रवार असे दोनच दिवस शिल्लक असून यादिवशी मोठी गर्दी होणार आहे.

- Advertisement -

काल बुधवारी तिसर्‍या दिवशी सरपंचपदासाठी सुरेशनगर, भेंडा खुर्द व कांगोणी येथील प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. सुरेशनगर येथील अर्ज शैला कल्याण उभेदळ यांचा तर भेंडा खुर्द येथील सरपंचपदासाठी काल बुधवारी वर्षा वैभव नवले यांचा अर्ज दाखल झाला.

सदस्यपदासाठी काल 19 अर्ज दाखल झाले असून त्यातील सर्वाधिक 12 अर्ज वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीसाठी दाखल झाले आहेत. शिरेगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी 4, माळीचिंचोरा ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 2 तर कांगोणीच्या सदस्यपदासाठी एक अर्ज दाखल झाला.

वडाळा बहिरोबा येथील सदस्य पदासाठी प्रभाग 1 मधून सर्वसाधारणसाठी निखील नितीन मोटे व संग्राम चंद्रकांत मोटे यांचे अर्ज दाखल झाले. याच प्रभागातील स्त्री राखीव जागेसाठी सुवर्णा श्रीकांत मोटे यांचा अर्ज दाखल झाला. प्रभाग 2 च्या सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी राजश्री ललित मोटे यांचा तर याच प्रभागातील अनुसूचित जाती जागेसाठी अरुण सीताराम राऊत यांचा अर्ज दाखल झाला. प्रभाग 3 मधील नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्री जागेसाठी ज्योती राहुल मोटे व सुवर्णा श्रीकांत मोटे यांचे अर्ज दाखल झाले.

प्रभाग क्र. 4 मधील सर्वसाधारण जागेसाठी सुनील लहू मोटे यांचा अर्ज दाखल झाला तर सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी सुनीता लहू मोटे यांचा अर्ज दाखल झाला. प्रभाग क्र. 5 साठी अनुसूचित जातीच्या जागेसाठी विठ्ठल काशिनाथ पवार यांचा अर्ज दाखल झाला. अनुसूचित जमाती जागेसाठी संदीप प्रकाश पवार यांचा अर्ज दाखल झाला तर याच प्रभागातील सर्वसाधारण स्त्री जागेसाठी विजया सचिन मोटे यांचा अर्ज दाखल झाला. अशाप्रकारे वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीसाठी तिसर्‍या दिवशी वरीलप्रमाणे सदसस्यपदासाठी 12 अर्ज दाखल झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या