Friday, May 3, 2024
Homeनगरग्रामपंचायत मतदानापूर्वीच निवडणूक यंत्रणा आणि प्रक्रिया राबविण्यार्‍यात वाद!

ग्रामपंचायत मतदानापूर्वीच निवडणूक यंत्रणा आणि प्रक्रिया राबविण्यार्‍यात वाद!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ग्रामपंचायत निवडणुक 2022 साठी मतदान केंद्रावर प्राथमिक शिक्षकांना केंद्राध्यक्ष (मतदान केंद्रप्रमुख) म्हणून नियुक्त केले आहे. यावर शिक्षकांनी आक्षेप घेतला असून मतदान केंद्राध्यक्ष म्हणून प्राथमिक शिक्षकांची नेमणूक केलेले आदेश रद्द करावे, तसेच इतर मागण्यासंदर्भात निवडणुकीसाठी नेमणूक केलेल्या प्राथमिक शिक्षकांनी निवडणुक विभागाचे लक्ष वेधले आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीआधीच निवडणूक यंत्रणा आणि मतदान प्रक्रिया राबवणार्‍या यंत्रणेत वादाला तोंड फुटले आहे.

- Advertisement -

राज्यात अवैध गौण खनिज विरोधात कारवाई सुरुच राहील

नगर तालुक्यातील शिक्षकांनी याबाबत तहसिलदार यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाच्या 27 जानेवारी, 1995 च्या आदेशानुसार मतदान केंद्राध्यक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थाचे अधिकारी व कर्मचारी असू नयेत. तसेच मतदान केंद्राध्यक्ष हा मतदान केंद्रावरील वरिष्ठ व प्रमुख अधिकारी असल्याने त्याची जबाबदारी सर्वाधिक आहे. हा अधिकारी शक्यतो राजपत्रित अधिकारी असावा किंवा त्या वरिष्ठ दर्जाचा पर्यवेक्षकाचा काम पाहणारा अधिकारी असावा, म्हणून मतदान केंद्राध्यक्ष म्हणून नेमणुक केलेले आदेश हे प्राथमिक शिक्षकांचे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.

जानेवारीमध्ये नगर-मनमाड महामार्गाच्या कामास प्रारंभ

तसेच दिव्यांग व बीएलओ कर्मचारी यांची नेमणूक रद्द करण्यात यावी, गंभीर आजारी व 50 वर्षे वयाच्या पुढे असलेल्या महिला कर्मचारी यांचे आदेश रद्द व्हावेत, निवडणुक असलेल्या गावातील प्रत्यक्ष मतदार असणार्‍या कर्मचार्‍यांचे आदेश रद्द करण्यात यावे, त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवू नये, काही शाळांमध्ये 100 टक्के शिक्षकांना नेमणुका दिलेल्या आहेत अशा संबंधीत शाळांमध्ये किमान 50 टक्के शिक्षक शाळांमध्ये ठेवण्यात यावे जणेकरून संबंधीत शाळा पूर्ण क्षमतेने चालू राहिल, अशी मागणी करण्यात आली आहे.

आदिवासी विद्यार्थी मारहाण प्रकरणी शिरपुंजे आश्रमशाळेतील अधीक्षकावर निलंबनाची कारवाई

या मागणीची प्रत उपजिल्हा निवडणुक अधिकारी यांना देण्यात आली आहे. निवेदनावर बापूसाहेब तांबे, राजेंद्र निमसे, दत्ता कुलट, नितीन पंडीत, किशोर हिरे, सुभाष काळे, राहुल सुर्यवंशी, आबासाहेब ठाणगे, विजय शिंदे, बाळासाहेब वाबळे, बाळासाहेब दंडगे, बी.बी.पवार आदींच्या सह्या आहेत.

जिल्ह्यात गोंधळ

203 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी कर्मचारी, अधिकारी यांच्या नेमणूका करतांना महसूल विभागाने गोंधळ घातलेला आहे. अनेक तालुक्यात पात्र माध्यमिक शिक्षक यांना वगळण्यात आलेले आहे. तर काही ठिकाणी सामान्य उपअध्यापक शिक्षक यांच्यावर थेट निवडणूक मतदान केंद्रप्रमुखाचा भार माथी मारण्यात आलेला आहे. निवडणूक यंत्रणेने संपूर्ण जिल्हा धोरण राबवलेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या