Tuesday, March 25, 2025
Homeजळगावमहायुतीचे सरकार देशातील सर्वात भ्रष्ट सरकार - खा.इम्रान प्रतापगढी

महायुतीचे सरकार देशातील सर्वात भ्रष्ट सरकार – खा.इम्रान प्रतापगढी

रावेर । प्रतिनिधी –

महायुती सरकारने अडीच वर्षात कोणतीच विकासकामे केली नाही. केवळ सत्ता राखण्यात त्यांचा वेळ गेला सर्वच ठिकाणी आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे घडली आहेत. महायुतीचे सरकार देशातील सर्वात भ्रष्ट सरकार ठरले आहे असा घणाघात राज्यसभेचे खासदार तथा प्रसिद्ध उर्दू शायर इम्रान प्रतापगढी यांनी केला. महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचारार्थ फैजपूर येथे झालेल्या सभेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी जळगावचे करीम सालार यांनी कॉँग्रेसमध्ये खासदार प्रतापगढी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

- Advertisement -

यावेळी व्यासपीठावर उमेदवार धनंजय चौधरी, चोपड्याचे उमेदवार प्रभाकर सोनवणे, आमदार शिरीष चौधरी, हरियाणाचे भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दीपक लांबा, जम्मू काश्मीरच्या साइमा जान, इनायत उल्लाखान, कॉँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे, हारून नदवी, माजी आमदार रमेश चौधरी, करीम सालार, मुकुंद सपकाळे, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादीचे रावेर तालुकाध्यक्ष किशोर पाटील, कॉँग्रेसचे यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, कॉँग्रेसचे रावेर तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष हरिष गणवाणी, फैजपूरचे कुर्बान शेख, शब्बीर शेख, प्रल्हाद बोंडे, रमेश महाजन रोझोदा, योगिता वानखेडे, मानसी पवार, योगेश पाटील, राजू तडवी, सुनील कोंडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

धनंजय चौधरी यांच्या प्रचारासाठी प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी जम्मू काश्मीर येथून आलेल्या साइमा जान, इनायत उल्लाखान, हारून नदवी, करीम सालार, प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, ज्ञानेश्वर बढे यांनी सभेला संबोधित केले. यावेळी खासदार इम्रान प्रतापगढी यांनी भाजप सरकारवर टीका केली. मात्र मतदारांनी मतांच्या माध्यमातून ताकद उभी करावी असे आवाहन खा. प्रतापगढी यांनी यावेळी उपस्थितांना केले. सूत्रसंचालन नेहा चौधरी यांनी केले.

मराठा महासंघ व राष्ट्रीय दलित पँथरचा पाठिंबा
गत काळात आमदार शिरीष चौधरी यांचे काम व समाज विकासासाठी केलेले प्रयत्न यामुळे धनंजय चौधरी यांचे हात बळकट करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या रावेर यावल शाखेने महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांना पाठिंबा दिला आहे. तसेच राष्ट्रीय दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भालेराव यांच्या आदेशावरून उमेदवार धनंजय चौधरी यांना पाठिंबा दिला असल्याचे पत्र देण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...