Sunday, May 5, 2024
Homeराजकीयखासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा!

खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा!

मुंबई | Mumbai

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत कौर राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

- Advertisement -

तसेच सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावल्या आहेत. न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने ८ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत ​​सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावत चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ जून रोजी होणार आहे.

दरम्यान ८ जूनला नवनीत राणा यांचे जातप्रमाण रद्द करत असल्याचा निर्णय न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने घेतला होता. त्या सोबत नवनीत राणा यांना २ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.

२०१९ च्या लोकसभा निवडणूकीमध्ये नवनीत राणा यांच्या विरूद्ध शिवसेनेचे आनंदराव अडसूळ उभे होते. पराभूत आनंदरावांनी नवनीत राणा यांच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. त्याची न्यायालयीन लढाई ते लढत होते अशातच काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांची खासदारकी धोक्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या