Sunday, September 15, 2024
Homeनगरगुणवत्तापूर्ण आणि सर्वांगिण शिक्षणात संगमनेर अग्रेसर- नागणे

गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगिण शिक्षणात संगमनेर अग्रेसर- नागणे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यामध्ये संगमनेर शिक्षण विभाग करत असलेली नेत्रदीपक कामगिरी तालुक्यासाठी भूषणावह असल्याचे गौरवोद्गार अध्यक्षस्थानावरून बोलताना गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी काढले.

व्ही स्कूल घटक निर्मिती ,शिक्षक सत्कार, नवोदय निवड विद्यार्थी गुणगौरव, स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त शाळा व आदर्श शाळा सत्कार सोहळा येथील सह्याद्री महाविद्यालयातील सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी सह्याद्री बहुजन शिक्षण प्रसारक संस्थेचे रजिस्ट्रार बी. आर. गवांदे, सह्याद्री महाविद्यालयाचे प्राचार्य दीनानाथ पाटील, एम. वाय. दिघे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी के. के. पवार, लोटस विद्यालयाच्या संचालिका डॉ.नीलिमा निघुते, केंद्रप्रमुख दशरथ धादवड, अशोक गोसावी, प्रभाकर रोकडे, यशवंत आंबेडकर, विद्या भागवत, अलका साखरे, पंचायत समितीचे वरिष्ठ लिपीक अरुण जोर्वेकर, संदीप मंडलिक, प्रदीप कुदळ, संदीप मोरे, योगेश मोरे, संदीप कवडे, दत्ता लेंडाळ, नंदू रकटे, गंगाधर टेंगळे, महेश काळे, सुजाता वाघ, वैशाली गुंजाळ, संगीता गायकवाड, दिगंबर फटांगरे, शांताराम आंबरे, शिवाजी आव्हाड, मन्सूर पटेल आदींसह तालुका शिक्षण समिती सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही स्कूल अ‍ॅपचे तालुका समन्वयक, तंत्रस्नेही शिक्षक सुरेश भारती यांनी केले. ईशस्तवन व स्वागतगीत सादरीकरण जि. प. प्राथ. शाळा निळवंडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले. सर्व शिक्षक, अधिकारी व पदाधिकारी यांच्या समन्वयातून संगमनेर तालुक्यात शिक्षण विभागाचे मोठे काम उभे राहत आहे. यात खारीचा वाटा उचलायला मिळतो याचा अधिक आनंद आहे, असे गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे म्हणाल्या.

करोना काळानंतर देखील अभ्यासपूर्व तयारी (होम वर्क) आणि शिक्षकांसाठीही उपयुक्त असणारे व्ही-स्कूल अ‍ॅप आज देखील महत्त्वाचे ठरत असून, वर्गात ऑफलाईन शिक्षणात देखील मोठ्या स्क्रीनवर या अ‍ॅप मधील आपल्याच जिल्ह्यातील शिक्षकांनी केलेले अभ्यास साहित्य विद्यार्थ्यांना पाहता येते ही एक पर्वणीच ठरली असून, संगमनेर तालुक्याने तयार केलेल्या अभ्यास साहित्याचा उपयोग करून खेडोपाडी हे साहित्य उपलब्ध झाले. यातून प्रेरणा घेत वृंदा पोखरकर आणि विराट खाडे या विद्यार्थ्यांनी नवोदयमध्ये प्रवेश मिळवला आहे. या सर्व बाबींचे विवेचन व्ही-स्कूल समन्वयक राहुल बांगर यांनी केले. व्ही स्कूल निर्मिती कार्यशाळेसाठी सहकार्य केल्याबद्दल डॉ. देवेंद्र ओहरा ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य कारभारी वाकचौरे, कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे प्रख्यात विमा प्रतिनिधी बी. के. जोशी, व्हि स्कूल वोपा जिल्हा समन्वयक राहुल बांगर यांचा विशेष सन्मान कार्यक्रमात करण्यात आला.

व्हि स्कूल अ‍ॅपच्या घटक निर्मितीत सहकार्य करणार्‍या सर्व तंत्रस्नेही शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे पठार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर खंदरमाळ, ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर, एस. एम. बी. थोरात विद्यालय डिग्रस, मातोश्री रु. दा. मालपाणी प्राथमिक विद्या मंदिर संगमनेर, ज्ञानमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संगमनेर, अमृतवाहिनी मॉडेल स्कूल अमृतनगर संगमनेर, लोटस इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव पान, अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल घुलेवाडी या शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या पिंपळगाव माथा, निमज, मोठेबाबा वाडी या शाळांना जुलै 2022 साठीचा तालुकास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला. ओमकार पवार, हर्षद भालेराव, सार्थक गाडेकर, संस्कार कडाळे, विराट खाडे, वृन्दा पोखरकर, समृद्धी मिसाळ, श्रद्धा दुर्गुडे या विद्यार्थ्यांचा नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याबद्दल वर्ग शिक्षकांसह सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश भारती, सुनील झावरे, सुनील घुले, हौशीराम मेचकर, संजय लिमकर, मच्छिंद्र ढोकरे, सुनील आढळ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ घुले यांनी केले तर आभार सुनील घुले यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या