Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यभरात गुढीपाडव्याचा जोरदार उत्साह! ठिकठिकाणी शोभायात्रा, घरोघरी उभारली गुढी... पाहा Photo/Video

राज्यभरात गुढीपाडव्याचा जोरदार उत्साह! ठिकठिकाणी शोभायात्रा, घरोघरी उभारली गुढी… पाहा Photo/Video

मुंबई | Mumbai

राज्यात आज गुढीपाडवा अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा पहिला दिवस आणि त्यामुळे पहिला सणही. (Gudi Padwa in Maharashtra) साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्याने आज गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नव्या गोष्टींना सुरूवात केली जाते. घर खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवे उपक्रम, सोने खरेदी या गोष्टी आजच्या दिवशी केल्या जातात. घरोघरी दारी गुढी उभारून विजय आणि समृद्धीचं प्रतीक साजरं केलं जातं. पाडव्या निमित्तानं राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी रिघ पहायला मिळत आहे.

- Advertisement -

राज्याच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गुढी पाडव्याचा उत्साह व्यक्त करण्यात येतो. उपनगरांसह अनेक भागांमध्ये शोभायात्रा काढण्यात येतात. या शोभायात्रांमधून अनेक सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर संदेश देण्याचं काम केलं जातं. तसंच काहीसं चित्र यंदाही नाशिक, ठाणे, डोंबिवली आणि इतर भागांमध्ये दिसून आलं. भल्या सकाळी ठाणेकर, डोंबिवलीकर या यात्रांमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. विशेषत: तरुणाईचा उत्साह या शोभायात्रांचं विशेष आकर्षण ठरत आहे.

ठाण्यातल्या शोभायात्रेमध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाल्यामुळे ठाणेकरांचा उत्साह अधिकच वाढला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला गुढी पाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ठाण्यातल्या कोपिनेश्वर मंदिरातही त्यांनी दर्शन घेतलं. मी गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या महाराष्ट्रवासीयांना शुभेच्छा देतो. सगळ्यांना नवीन वर्ष सुखा-समाधानाचं आणि आरोग्यदायी जावो.

करोनामुळे आपल्या सणांवर निर्बंध आणि मर्यादा होत्या. पण आपल्या सरकारने ते उठवल्यानंतर गोविंदा, दहीहंडी, गणपती, नवरात्रौत्सव, दिवाळी असे सगळे सण महाराष्ट्राच्या जनतेनं जल्लोषात पार पाडले. आजचा गुढी पाडवाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी जनता सहभागी झाली आहे. हजारो ठाणेकर नागरिकही सहभागी झाले आहेत. अनेक चित्ररथ यात्रेत आहेत. यापूर्वीच्या शोभायात्रेपेक्षा दुप्पट उत्साह नागरिकांमध्ये दिसतोय, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मी गेली अनेक वर्षं या शोभायात्रेत न चुकता सहभागी होतो. यावर्षी मुख्यमंत्री म्हणून या शोभायात्रेत सहभागी होण्याचा मला आनंद आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

नागपूर येथेही पाढव्याच्या उत्साहात तरुणाई आनंदाने सहभागी झालेली पाहायला मिळत आहे. या सणाचा आनंद साजरा करत असताना तरुणाईने केलेल्या लेझीम नृत्याचा एक व्हिडिओ पुढे आला आहे.

गुढीपाडव्यानिमित्त नागपुरातही मराठी नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. नागपुरात तरुण तरुणी पारंपरीक वेषशुभेत शोभायात्रेत सहभागी झालेत..तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौक अशी ही शोभायात्रा काढण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त नागपुरात 51 फूट उंच गुढी उभारून सामूहिक हनुमान चालीसा, सामूहिक रामरक्षा तसेच सामूहिक आरती केली जाणार आहे.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि गिरीजा ओक-गोडबोले याची या शोभायात्रेला विशेष उपस्थिती लावली होती. नागपुरातील शोभायात्रेत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि गिरीजा ओक या शोभायात्रेत उत्साहात सहभागी झाल्याने अधिकच उत्साह पाहायला मिळाला.

डोळ्याची पारणे फेडणार दृश्य! विठूरायाला फुलांची आरास

गुढी पाडवा अर्थात चैत्र प्रतिपदा हिंदू मराठी नवावर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त आज विठुरायाच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील भाविक नानासाहेब मोरे पाचनकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे. या सजावटीसाठी शेवंती 450 किलो, पिंक कन्हेर 40 किलो, अस्तर 40 किलो , झेंडू 100 किलो आणि गुलाब 50 गड्डी वापरण्यात आला आहे.

दुबईत साजरा केला गुढीपाडवा

दुबई येथे जगदीश जिवतोडे, जयश्री, ऐश्वर्या, कौस्तुभ आणि रुपेश मोवाडे यांनी गुढीपाडवा साजरा केला आहे. गुढीपाडव्या निमित्त जीवतोडे कुटुंबाने राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या