Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedVideo : झाडावर अडकलेल्या पाहुण्या पक्ष्याला दिले जीवदान

Video : झाडावर अडकलेल्या पाहुण्या पक्ष्याला दिले जीवदान

नाशिक | प्रतिनिधी

‘प्रेम कुणावरही करावे’..ही कुसुमाग्रज यांची ही अत्यंत गाजलेली कविता. त्याचा अनुभव नेहमी येत असतो. नाशिकमधील अशोक स्तंभ परिसरातील रॉकेल गल्लीत झाडावरील मांज्यात अडकलेल्या खैरी ढोकरीवर पक्षाला नाशिक मनपाच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वाचवले व पक्षी मित्राच्या ताब्यात दिले.

- Advertisement -

रात ढोकरी हा श्रीलंका, अंदमान आणि निकोबार बेटावर सापडणार पक्षी आहे. उन्हाळ्यात काश्मीर आणि नेपाळात एकोणीसशे मीटर उंचीपर्यंत असतो. पाहुणा म्हणून तो नाशिकमध्ये आला होता.

पिंपळाच्या झाडावर तो अडकून पडला. मांज्यात अडकलेल्या रात ढोकरी सुटण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करु लागलो. पण त्याचे परिश्रम अपुरे पडत होते. घनश्याम मोहिते यांनी ही बाब अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना कळवली. मग आनंद फडताणे, मंगेश मालपाठक, दत्तू जाधव, प्रकाश दिघे यांनी व इतर कर्मचाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरु केले. अग्नीशम बंब घेऊन ते घटनास्थळी दाखल झाले. शेजारच्या चार मजली इमारतींवरुन झाडावर कर्मचारी पोहचले.

अखेरी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. जखमी रात ढोकरीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यास पक्षी मित्रांच्या ताब्यात अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सोपवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या