Wednesday, December 4, 2024
HomeUncategorizedगिनिज वर्ल्ड रेकॉर्ड : उंचीपेक्षाही लांब आहेत या तरुणीचे केस

गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड : उंचीपेक्षाही लांब आहेत या तरुणीचे केस

नवी दिल्ली – New Delhi World record

18 वर्षीय निलांशी पटेलने आपल्या नावे असलेला आधीचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढत, पुन्हा एकदा नवा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

- Advertisement -

गुजरातमध्ये राहणाऱ्या निलांशी पटेलने तिच्या केसांच्या उंचीसाठी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

निलांशीच्या केसांची उंची 6 फूट 6 इंच इतकी आहे.

निलांशी वयाच्या 6 व्या वर्षापासून आपले केस वाढवत आहे.

पार्लरमध्ये झालेल्या एका अनुभवामुळे तिने आपले केस कधीही न कापण्याचा निर्णय घेतला.

पार्लरमध्ये निलांशीचा हेअर कट बिघडला होता. त्यानंतर तिने केस न कापण्याचा निर्णय घेतला.

तेव्हापासून म्हणजेच वयाच्या सहाव्या वर्षापासून तिने केस न कापण्याचं ठरवलं.

निलांशीची आई केसांची देखभाल करण्यासाठी तिला मदत करते.

यापूर्वीही सर्वात लांब केसांचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड निलांशीच्या नावे होता.

नोव्हेंबर 2018 मध्ये तिने हा रेकॉर्ड केला होता.

इटलीच्या टीव्ही शो द नाईट ऑफ रेकॉर्ड्समध्ये ती दिसली होती. त्यावेळी निलांशीच्या केसांची लांबी 5 फूट 7 इंच इतकी होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या