Saturday, October 12, 2024
Homeदेश विदेशधक्कादायक ! भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; १५ मजुरांचा जागीच मृत्यू

धक्कादायक ! भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; १५ मजुरांचा जागीच मृत्यू

सुरत | Surat

गुजरातच्या सुरतमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. सूरतच्या पलोड गावांनजीक एका ट्रकने

- Advertisement -

रस्त्याच्या कडेला झोपलेल्या १८ मजूरांना चिरडले. त्यामध्ये, १५ जणांचा मृत्यू झाला असून इतर ३ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत १५ जणांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. या घनटेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “किमान १३ जणांना ट्रकने चिरडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना सुरतमधील कोसांम्बामध्ये घडलीय,” असं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. तसेच मरण पावलेले व्यक्ती ही मजूर असून ते सर्वजण मूळचे राजस्थानमधील रहिवाशी असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

या रस्ते अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी हीच प्रार्थना, मोदी यांनी म्हटलं आहे.

तसेच या अपघातात मृत्यू झालेल्या मजुरांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येईल, असं ट्विट पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

सूरतमधील पलोड गावाच्या जवळ असणाऱ्या किम मांडवी रस्त्यावर हा अपघात झाला आहे. किम हाकर मार्गाजवळ एका ट्रकचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. रात्री बारानंतर झालेल्या या अपघातामध्ये ट्रक एका ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकला. मांडवीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर ट्रॅकवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रकचा चालक आणि क्लिनरही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या