मुंबई । प्रतिनिधी Mumbai
- Advertisement -
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याने महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
राष्ट्रपती भवनातून गुरुवारी याबाबतची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे आचार्य देवव्रत गुजरातसह महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.




