Friday, May 3, 2024
Homeनगरबंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न फसला

बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न फसला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न फसल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील शेतकरी रामदास चंद्रभान थोरात यांच्या कोल्हार – बेलापूर ररत्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळील निवासस्थानी मंगळवारी भरदुपारी साडेबारा दरम्यानही घटना घडली. या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

सध्या शेतात असलेल्या कांदा निवडीची लगबग सुरू आहे. त्यावेळी घरातील सगळेच सदस्य हे शेतात काम करत होते. यावेळी घरी एकटी मुलगी होती. तिचेही काम उरकून घराला कुलूप लावून शेताकडे गेली. काही वेळानंतर लोंखडी दरवाजाचा आवाज ऐकू आल्याने अक्षय हा घराकडे आला. तेथे एक पांढरे कापडे घेतलेला अज्ञात इसम झाडाखाली उभा होता. त्याच्या बरोबर असलेला दुसरा एक अज्ञात इसम घरामध्ये उचकापाचक करत असल्याचे अक्षयने पाहिल्यानंतर लगेच त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. अक्षयला बंदुकीचा धाक दाखवत तो आरडाओरडा करत घराकडे पळाला. काहीतरी आवाज आल्याने शेताकडचे ग्रामस्थ तेथे जमले.

तोपर्यंत चोरट्यांनी विनानंबरची (इनिकॉन) दुचाकीवरून बेलापूरच्या दिशेने पसार झाले. लगेच कोणतेही विलंब न करता ग्रामस्थांनी चोरट्यांचा बेलापूरपर्यंत पाठलाग केला. पण ते चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.

चोरट्यांच्या सुसाट वेगाने कोणत्या बाजूने गेल्याचे हे मात्र समजले नाही. यावेळी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या पेवरून तातडीने गावकर्‍यांना संदेश दिल्याने गावकरी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.याबाबत घटनेची माहिती बेलापूर पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल माहिती घेत वरिष्ठांना कळविली होती. पोलिसांनी कोल्हार – बेलापूर – उक्कलगाव येथील सीसीटीव्ही कॅमेरे पाहणी करत फुटेज तपासले. विनानंबरची दुचाकीवरील चोरट्यांनी तोंडाला बांधलेले असल्याने स्पष्ट दिसत नव्हते.अश्या प्रकारे भरदुपारी बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा नशीबने प्रयत्न फसला.या घटनेने उक्कलगाव परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र याआधी अश्याप्रकारे दोन घटना भरदुपारी घडल्याचे गावकर्‍यांनी सांगितले.

ग्रामसुरक्षा कुचकामी यंत्रणा

गावपातळीवर अधिक मोठ्या घटनेच्या माहिती देण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत गावकर्‍यांना कळविले जाते.यावेळी ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल व्हावे यासाठी मात्र तोपर्यंत घटना घडली जाते. यंत्रणेच्या याआधीच ग्रामस्थांना बातमी कळते. मग यंत्रणा प्रभावी होते हे विशेष…या कुचकामी झालेल्या यंत्रणेला आता प्रभावीरीत्या अंमलबजावणी करण्याचे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या