Wednesday, March 26, 2025
Homeदेश विदेशडेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला मोठा दिलासा; 'या' प्रकरणात...

डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला मोठा दिलासा; ‘या’ प्रकरणात केली निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला मोठा दिलासा मिळाला आहे. सिरसा कॅम्पचे माजी व्यवस्थापक रणजीत सिंह याच्या हत्या प्रकरणात राम रहीमला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. या प्रकरणात राम रहीमसह ५ दोषींची निर्दोष सुटका केली आहे.

बाबा राम रहीमने जन्मठेपेच्या पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात शिक्षेविरोधात अपील दाखल केले होते. मंगळवारी त्यांच्या अपिलावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द केल्याने बाबा राम रहीम याच्यासह इतर ५ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याप्रकरणी सविस्तर आदेश येणे बाकी आहे.

- Advertisement -

बाबा राम रहीमचे हे प्रकरण २२ वर्षे जुने आहे, यामध्ये सीबीआय कोर्टाने डेरा प्रमुख राम रहीमला १९ वर्षांनंतर दोषी ठरवले होते. राम रहीम सध्या तुरुंगात असून पत्रकार हत्या आणि साध्वी बलात्कार प्रकरणात त्याला दोषी ठरवले होते. याशिवाय राम रहीमवर सिरसा कॅम्पचे व्यवस्थापक रणजित सिंग यांची हत्या केल्याचा आरोप आहे. याच आरोपाखाली सीबीआयने राम रहीम याच्याविरोधात खटला दाखल केला होता.

पोलिस तपासावर असमाधान व्यक्त करत रणजित सिंह यांचा मुलगा जगसीर सिंह याने जानेवारी २००३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये राम रहीमसह पाच आरोपींना दोषी ठरवण्यात आले.

दरम्यान, मंगळवारी न्यायालयाने बाबा राम रहीमच्या याचिकेवर अंतिम सुनावणी घेतली. त्यात, सबळ पुरावे नसल्याने उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. सध्या राम रहीम रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहे. याआधी ही बाबा राम रहीम अनेक वेळा तरुंगाबाहेर आला आहे. यावरून सरकारवर बरीच टीका झाली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...