Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यासटाण्यात सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त

सटाण्यात सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त

सटाणा । Satana

शहरात अवैधरित्या गुटखा साठा केलेल्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून सुमारे 2 लाख 23 हजार रुपये किमतीचा माल जप्त केला आहे.

- Advertisement -

शहर व तालुक्यात राजरोज पणे गुटखा विक्री होत असल्याचे या प्रकारणातून निदर्शनास आले आहे.

शहरातील काही सुपारी सेंटर विक्रते गुटख्याची होलसेल विक्री करीत असल्याची माहिती नाशिक जिल्ह्याचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली.

यानंतर मालेगाव विभागाचे अप्पर पो.अधिक्षक संदीप घुगे,पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी पी.एस पाटील यांच्या सहकार्‍यांसह शहरात उर्दु शाळेजवळ व तालुक्यातील ठेंगोडा शिवारात धाड टाकून 2 लाख 23 हजार 436 रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला.

अवैद्य गुटखा विक्री करणार्‍या दोघांना सटाणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

या छापेमारीत सपोनि देवेंद्र शिंदे, किरण पाटील, पो.उप नि. राहुल गवई पोलिस पुंडलिक डबाळे,अजय महाजन, रवींद्र भामरे, प्रकाश शिंदे, जिभाऊ बागुल, जितेंद्र पवार यांनी कामगिरी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या