Friday, May 3, 2024
Homeनगरकोपरगावात सहा लाखांचा गुटखा जप्त, तिघांना अटक

कोपरगावात सहा लाखांचा गुटखा जप्त, तिघांना अटक

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहराजवळील टाकळी नाका येथे गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू विक्रेत्या विरुध्द अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून 5 लाख 92 हजार 678 रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईने अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

पोनि अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली, कोपरगाव येवला रोडवरील, टाकळी नाक्याजवळ गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू मारुती कंपनीच्या वॅगनर व ओमनी गाडीमध्ये घेऊन येणार आहे. खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि कटके यांनी गुन्हे शाखेचे मनोहर शेजवळ, पो.हे.कॉ. संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पो.ना. शंकर चौधरी, संतोष लोढे, राहुल सोळंके, पो.कॉ.सागर ससाणे, रोहित जाधव, गावडे व भरत बुधवंत यांना बोलावून कारवाई करणे बाबत आदेश दिले.

पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कोपरगाव येवला रोडवरील टाकळी नाका येथे जाऊन खात्री केली असता मारुती कंपनीची एक राखाडी रंगाची वॅगनर कार व एक ओमनी कार या वाहनांवर छापा टाकून विविध प्रकारचा गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी व सुगंधी तंबाखु वाहनात असलेला दिसल्याने पथकाने वाहनातील इसम वसिम चाँदभाई चौपदार रा. गांधीनगर, कोपरगाव, राजमल मिश्रीलाल बोथरा रा. निवारा, कोपरगाव, अर्जुन लक्ष्मण शेळके रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव यांना ताब्यात घेतले.

त्यांच्या ताब्यातील वाहन व गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी व सुगंधी तंबाखु या बाबत विचारपूस करता सदर माल आमचा असुन आम्ही तो विक्री करण्यासाठी आणला आहे अशी कबुली दिल्याने त्यांना 2 लाख 82 हजार 678 रु. किंमतीचा विविध प्रकारचा गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी व सुगंधी तंबाखु तसेच मारुती कंपनीची राखडी रंगाची 1 लाख 50 हजार रु. किंमतीची बॅगनर व पांढर्‍या रंगाची 1 लाख 60 हजार रु. किंमतीची ओमनी असा एकुण 5 लाख 92 हजार 678 रु. किंमतीचा मुद्देमालासह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील कारवाई कोपरगाव शहर पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या