Sunday, May 5, 2024
HomeनाशिकNashik Crime News : गुटख्याची तस्करी करणाऱ्यास अटक

Nashik Crime News : गुटख्याची तस्करी करणाऱ्यास अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी (Gutkha Smuggler) करणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने मध्यप्रदेशमधील इंदोर (Indore) येथून अटक केली आहे. इसरार मन्सुरी मुस्ताक मन्सुर (३५, रा. इंदोर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामीण पोलिसांच्या (Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने १४ फेब्रुवारीला मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) कारवाई करीत कंटेनर पकडला होता. या कारवाईत पोलिसांनी २१ लाख रुपयांचा अवैध गुटखा (Illegal Gutkha) जप्त केला होता. याप्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघा संशयितांना अटक केली होती. दोघांकडे केलेल्या चौकशीतून त्यांनी मुख्य सुत्रधार इसरार मन्सुरी याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, उपनिरीक्षक संदीप पाटील, हवालदार चेतन संवत्सरकर, नाईक योगेश कोळी, गिरीष बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम आदींच्या पथकाने इंदोर येथे सापळा रचला. तेथून संशयित मन्सुरी यास पकडले. मन्सुरी हा बंद कंटेनरमध्ये गुटखा लपवून विविध राज्यांमध्ये तस्करी करत असल्याचे उघड झाले. यानंतर त्याला न्यायालयात (Court) हजर केले असता न्यायालयाने मन्सुरी यास १ मार्चपर्यंत पोलिस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या