Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमNashik Crime News: पेठ-नाशिक मार्गावर ३२ लाख रुपयांचा गुटखा जप्त; तीन जणांना...

Nashik Crime News: पेठ-नाशिक मार्गावर ३२ लाख रुपयांचा गुटखा जप्त; तीन जणांना अटक

ओझे | वार्ताहर
पेठ-नाशिक मार्गावरील उमराळे चौफुलीवर पोलिसांनी २९ लाख २६ हजारांचा गुटखा व तीन लाखांचे वाहन असे एकूण ३२ लाख २६ हजारांचा ऐवज जप्त केला. तीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयितास अटक करण्यात आली आहे.

गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात गुटखा तस्करी सुरूच आहे. स्थानिक पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकांनी अनेक वेळा गुटखा तस्करीविरोधात कारवाया करूनही मनोधैर्य उंचावलेल्या तस्करांची तस्करी सुरूच आहे. दरम्यान, दिंडोरी पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे कंटेनरमधून पेठ-नाशिक या मागनि प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्याची खातरजमा पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी केली, पेठ-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील उमराळे चौफुली येथे सापळा लावला.

- Advertisement -

त्यादरम्यान एमएच ४३ बीएक्स ४९४३ हा कंटेनर संशायास्पद स्थितीत या ठिकाणी आला, संशयावरून पोलीस पथकाने हे वाहन थांबवले. तपासणी केली असता १९ लाख ४४ हजार रुपये किमतीच्या सफेद रंगाच्या ६० मोठ्या गोण्या होत्या. पोलिसांनी तपासणी करून ३२ लाख २६ हजारांचा ऐवज जप्त केला. पोलीस हवालदार बाळासाहेब पानसरे यांच्या फिर्यादीवरून अमीर युनूस खान (रा. भरंगपूर, तहसील ताबडू, जिल्हा नहु मेवात, राज्य हरियाणा), मनदीप सिंग (मूळ रा. आग्रारोड, मुलुंड, मुंबई सध्या रा. विरागडी दिल्ली), राकेशभाई (रा. दिल्ली) अशा तिघांबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीर खान यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास दिंडोरी पोलीस करत आहेत.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ajit Pawar Death : अजित दादांसारख्या लोकनेत्याला कायमचा मुकलो; शोकसभेत सर्वपक्षीय...

0
नाशिक | Nashik स्व.अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाने महाराष्ट्र एका लोकनेत्याला कायमचे मुकले आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यात कुठलीही...