दिल्ली | Delhi
- Advertisement -
अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि आयफोन निर्माता कंपनी अँप्पल यांच्यासह जगातील अनेक बड्या उद्योजक आणि नेत्यांची ट्विटर अकाउंट्स बुधवारी हॅक झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
क्रिप्टोकरन्सीज घोटाळ्यासाठी अशी अनेक हायप्रोफाईल ट्विटर अकाउंट्स हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्विटरने म्हटले आहे की, आमच्यासाठी हा एक कठीण दिवस असून लवकरच ती समस्या सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. या घटनेने जगभरात खळबळ उडाली असून ट्विटर कडून यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे.