Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशइराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धाचा भडका उडणार; हमासच्या प्रमुखाची हत्या

इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धाचा भडका उडणार; हमासच्या प्रमुखाची हत्या

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

मागील ९ महिन्यांपासून इराण आणि इस्त्रायल (Iran and Israel) यांच्यात युद्ध (War) सुरु आहे. त्यातच आज बुधवारी हमामचा प्रमुख इस्माईल हानिया (Ismail Haniyeh) यांची हत्या (Murder) करण्यात आली आहे. हमासने स्वत: याची माहिती दिली असून इराणची राजधानी तेहरानमध्ये इस्माईल हानिया मारल्या गेल्याचे म्हटले आहे. या हत्येच्या घटनेमुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : संपादकीय : ३१ जुलै २०२४ – माणसांना हे कधी पटणार?

मिळालेल्या माहितीनुसार, हानिया इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांच्या शपथविधी (Oath) कार्यक्रमात राजधानी तेहरानमध्ये पोहचले होते. त्यावेळी त्यांची हत्या करण्यात आली. अर्थात त्यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी कुणीही घेतलेली नाही. मात्र, या हल्ल्यामागे इस्त्राईलचा हात असल्याचे बोलले जात आहे.तर हानिया यांच्या मृत्यूमुळे हमासला मोठे खिंडार पडले आहे.

दरम्यान,एप्रिल २०२४ मध्ये इस्रायलने हानियाच्या तीन मुलांना ठार (Killed) केले होते. तसेच गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हमासने इस्रायलवर हजारो क्षेपणास्त्रे डागली होती. यात १ हजार १९५ लोक मारले गेले होते. तर २५० नागरिकांना (Citizen) ओलीस ठेवण्यात आले होते. यानंतर इस्रायलने हमासला संपविण्याचा विडा उचलला होता.यानंतर गाझा पट्टीवर हल्ला सुरु केला होता.

हे देखील वाचा : Kerala Wayanad Landslide : भूस्खलनातील मृतांची संख्या ९३ वर; १२८ जखमी, अनेकजण अडकल्याची भिती

बदला घेण्याची धमकी

हमासने इस्माईल हानियाच्या मृत्यूवर तातडीने प्रतिक्रिया नोंदवली आहे.हमासशी संबंधित शेहबने याविषयीचे वृत्त दिले आहे. हमासचे अधिकारी मौसा अबू मरजौक यांनी हा भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी इस्माईल हानिया यांच्या या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे इस्त्राईल आणि हमासमधील युद्ध तुर्तास थांबण्याचे कोणतेही चिन्ह नाहीत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या