Friday, May 3, 2024
Homeनगरहंडीनिमगाव पुलाचे काम प्रगतिपथावर

हंडीनिमगाव पुलाचे काम प्रगतिपथावर

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

नेवासा हंडीनिमगाव रस्त्यावर रानमळा परिसरात पुलासाठी 1 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून कामासही तात्काळ सुरुवात करण्यात आली आहे.

- Advertisement -

माजी मंत्री आ.शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून रानमळा येथील पुलाचे काम पूर्णत्वास येत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. हंडीनिमगाव, सुरेशनगर, उ दुमाला, रानमळा व नेवासा परिसरातील नागरिकांची पावसाळ्यात जाण्या-येण्याची पुलाआभावी गैरसोय होत होती.

अनेक वेळा वाहतूक थांबत असे. रानमळा नेवासा परिसरात तात्पुरत्या स्वरूपात असलेल्या पुलाच्या जागेवर नवीन पूल व्हावा व शेतकर्‍यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थानी माजी मंत्री आ.गडाख यांचेकडे केली होती. त्यानुसार गडाख यांनी पाठवपुरावा केला. नाबार्ड मधून पुढील पावसाळ्यापूर्वी पूल वाहतुकीस खुला होणार आहे. पुलाचे काम गुणवत्तापूर्ण पध्दतीने व्हावे यासाठी आमदार गडाख स्वतः लक्ष ठेवून आहेत.

5 वर्षांपूर्वी तत्कालीन लोकप्रतिनिधींकडून अनेक वेळा या पुलाचे काम मंजूर करण्यात येईल, असा शब्द देण्यात आला होता. मात्र माजी मंत्री आमदार गडाख यांनी तात्काळ काम मंजूर करून कामाला वेग दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या