Tuesday, November 26, 2024
HomeमनोरंजनHappy Birthday Rekha : 'सौंदर्य, अभिनय आणि विनम्रता' यामुळे आजही प्रेक्षकांच्या मनावर...

Happy Birthday Rekha : ‘सौंदर्य, अभिनय आणि विनम्रता’ यामुळे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे…

‘सलामें इश्क मेरी जान जरा कबूल कर ले, तू हमसे प्यार करने कि जरासी भूल कर ले’ म्हणत सगळ्यांवरच मोहिनी घातली…आज त्या वयाचे ६६ वर्षे पूर्ण करता आहेत.

रेखा… खरं नाव भानुरेखा गणेशन… पण, अजूनही बऱ्याचशा लोकांना हे नाव चटकन आठवणार नाही. त्यांच्या आरसपानी सौंदर्याची भुरळ आजही त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांच्या आहे.

- Advertisement -

तामिळनाडूतील चेन्नईमध्ये १० ऑक्टोबर १९५४ रोजी त्यांचा जन्म झाला. रेखा यांचे वडील तामिळमधले सुपरस्टार जेमिनी गणेशन होय. पण लहाणपणी रेखा यांना वडिलांचे प्रेम मिळालेच नाही. वडिलांनी पूर्णपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. रेखा यांच्या आईही तामिळ चित्रपटात काम करायच्या.

वडिलांनी दुर्लक्ष केल्यामुळे आर्थिक परिस्थिती अस्थिर होऊ लागली होती म्हणून रेखा यांच्या आई पुष्पावल्ली यांनी नशीब आजमावण्यासाठी रेखा यांना चित्रपटसृष्टीत ढकलले असंही म्हटलं जातं. नाईलाजानं त्यांनी अभिनय क्षेत्र स्विकारलं आणि जाबाबदारीच्या ओझ्याखाली त्यांचं बालपण कोमेजून गेलं.

१९६६ पासून तिने सिनेमात काम करायला सुरावात केली. रंगूला रत्नम नावाच्या तेलुगू सिनेमात तिने बालकलाकाराची भूमिका केली. १९७० मध्ये सावन भादों या चित्रपटापासून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली.

१९७१ साली, रेखाला तीन चित्रपट मिळाले, विनोद मेहराबरोबरचा ‘एलान’, संजय खानबरोबरचा ‘हसीनों के देवता’ आणि प्रेमेंद्रबरोबरचा ‘साज और सनम’. १९७२मध्ये ही संख्या पाच झाली, आणि तीही बड्या अभिनेत्यांबरोबर.

गोरा और काला, गॉंव हमारा शहर तुम्हारा (दोन्हींचे नायक – राजेंद्रकुमार), एक बेचारा (नायक – जीतेंद्र), रामपुर का लक्ष्मण (नायक – रणधीर कपूर) आणि जमीन आसमान (नायक – सुनील दत्त). १९७३ या वर्षी रेखाचे नऊ चित्रपट प्रदर्शित झाले. बहुतेक यशस्वी ठरले. बड्या हिरोंसह हृषीकेश मुखर्जींसारख्या बड्या दिग्दर्शकांबरोबरही रेखाला कामे मिळू लागली.

रेखा यांनी हिंदीसोबतच तामिळ, तेलगू आणि कानडी भाषेत १८० हून अधिक सिनेमामंध्ये काम केले आहे. त्यांना चित्रपट क्षेत्रात अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.

‘खूबसूरत, खून भरी मांग, खिलाडियों का खिलाडी, उत्सव, मुकद्दर का सिकंदर आणि उमराव जान’ या चित्रपटांमधील रेखाच्या भूमिका विशेष गाजल्या.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या