Wednesday, November 6, 2024
Homeनाशिक'हर घर तिरंगा अभियान' : नाशिक डाक विभागातर्फे रॅलीचे आयोजन

‘हर घर तिरंगा अभियान’ : नाशिक डाक विभागातर्फे रॅलीचे आयोजन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज नाशिक डाक विभागातर्फे नाशिकच्या मुख्य डाक घरातून सर्व कर्मचारी, पोस्टमन बांधव यांच्या समवेत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

सदरची रॅली ही जिल्हा परिषद, सी.बी.एस, मेहर सिग्नल, एमजी रोड, रेड क्रॉस सिग्नल, मेन रोड, शालिमार, गंजमाळ मार्गे परत जीपीओ नाशिक या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला.. रॅलीमध्ये हर घर तिरंगा तसेच पोस्टाच्या विविध योजनांची माहिती देणारे फलक नागरिकांचे आकर्षण ठरले होते, सदर रैली नाशिक डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक प्रफुल्ल वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

भद्रकाली पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने शिस्तबद्ध रितीने व वाहतुकीला कुठलाही अडथळा न होता रॅली यशस्वीरित्या आयोजन केले गेले. समारोप प्रसंगी सर्वांचे आभार मानण्यात आले व नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिक्षक यांचे मार्फत सर्व जनतेला आवाहन करण्यात आले कि नाशिक शहरातील वा जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिस मध्ये राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, तरी नजीकच्या पोस्ट ऑफिस मधे जाऊन केवळ रु. 25 देऊन तिरंगा ध्वज घेण्याचे आवाहन करण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या