Friday, May 3, 2024
Homeनगरहरेगाव व सूतगिरणी परिसरातील गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त

हरेगाव व सूतगिरणी परिसरातील गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर थापे टाकून पोलिसांनी अड्डे उद्ध्वस्त केले. यावेळी पोलिसांनी 1 लाख, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisement -

डीवायएसपी संदीप मिटके यांना, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव आऊटसाईड व श्रीरामपूर शहरातील सूतगिरणी येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने त्यांनी आपल्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना याठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिले. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी हरेगाव आऊट साईड परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश केला.

यावेळी रणजीत लक्ष्मण गायकवाड याचेकडून 45, 500 रुपये किमतीचे 650 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 1500 रुपये किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू, सुधीर काशिनाथ गायकवाड याचेकडून 42,000 रुपये किमतीचे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 1000 रुपये किमतीची 10 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू, मिनाबाई श्याम पवार हिच्याकडून 42,000 रुपये किमतीचे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 2000 रुपये किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण 1 लाख 34 हजार रुपये वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोव्हिबिशन गुन्ह्याचा माल जप्त केला. यातिघांविरुद्ध श्रीरामपूर तालुका व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक संदीप मिटके, पोलीस उपनिरिक्षक़ राजेंद्र आरोळे, हेड कॉन्स्टेबल सुरेश औटी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ आदींनी ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या