Thursday, May 2, 2024
Homeनगरकरोनाच्या पार्श्वभूमीवर मतमाउली यात्रा व दर्शन ऑनलाईन

करोनाच्या पार्श्वभूमीवर मतमाउली यात्रा व दर्शन ऑनलाईन

शिरसगाव |वार्ताहर| Shirsgav

श्रीरामपूर तालुक्यातील हरिगाव येथील मतमाउली भक्तिस्थान येथे सालाबादप्रमाणे 72 वा मतमाउली यात्रा महोत्सव करोना महामारी संकट

- Advertisement -

असल्याने शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेली मतमाउली यात्रा व दर्शन 2 सप्टेंबरपासून शासनाचे आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. असे संत तेरेजा चर्च धर्मगुरू पायस रॉड्रीक्स यांनी सांगितले. यात्रेची पूर्वतयारी म्हणून नऊ दिवस नोव्हेनाचे आयोजन व धार्मिक कार्यक्रम हे मतमाउली यात्रा महोत्सव 2020 या युट्यूब चॅनेलवर ऑनलाईन भाविकांनी घरबसल्या पहावयाचे आहेत.

12 सप्टेंबर रोजी मतमाउली यात्रा पवित्र मिस्सा बलिदान प्रार्थना हे सुद्धा सोशल मिडिया, ऑन लाईन, युट्यूबवर प्रसारित केला जाणार आहे. भाविकांनी दर्शनाकरिता चर्च परिसरात येऊ नये असे आवाहन शासनाच्या नियमानुसार करण्यात येत आहे. तरीही भाविकांनी सहकार्य करावे. 2 सप्टेंबर रोजी यात्रा उद्घाटन व ध्वजारोहण सोहळा होईल.

युट्यूब चॅनेलवर नोव्हेनावेळी दि. 3 सप्टेंबर रोजी पवित्र मरिया ख्रिस्तसभेची माता 4 सप्टेंबर रोजी पवित्र मरिया आशेची माता, 5 सप्टेंबर-पवित्र मरिया दयेची माता, 6 सप्टेंबर-पवित्र मरिया विस्थापितांचे शांतवन करणारी माता, 7 सप्टेंबर-पवित्र मरिया दु:खितांचे सांत्वन करणारी माता, 8 सप्टेंबर-पवित्र मरिया रोग्यास आरोग्य देणारी माता, 9 सप्टेंबर-पवित्र मरिया कुटुंबाची राणी, 10 सप्टेंबर -पवित्र मरिया शांततेची राणी, 11 सप्टेंबर -पवित्र मरिया ईश्वर कृपेची माता, या विषयावर नऊ दिवस नोव्हेना होईल.ज्या भाविकांना मिस्सा, नवस, व वैयक्तिक प्रार्थना अर्पण करावयाच्या असतील तर 9373541505 या मो.क्र वर धर्मगुरूंशी संपर्क करावा.

मतमाउली सणाची मिस्सा 12 सप्टेंबर रोजी अर्पण होईल. तरी सर्व भाविकांनी घरी सुरक्षित व स्वस्थ राहून मतमाउली सणाचा, दर्शनाचा लाभ थेट प्रक्षेपणाव्दारे घ्यावा असे आवाहन स्थानिक धर्मगुरू, धर्मभगिनी, व धर्मग्रामस्थ यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या