लोणी |वार्ताहर| Loni
हरियाणा (Haryana) राज्यात भारतीय जनता पक्षाला (BJP) मिळालेला विजय आत्मविश्वास वाढविणारा असून, विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशातील जनता विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहात असल्याचा संदेश या निकालाने दिला असल्याची प्रतिक्रीया महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केली. हरियाणा राज्यात सलग तिसर्यांदा भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री जे.पी नड्डा (J.P Nadda) आणि हरियाणामधील सर्व संघटनेच्या पदाधिकार्यांचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले, लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्हचा उपयोग करून विरोधकांनी निर्माण केलेल्या वातावरणाला हरीयाणांच्या निकालाने चपराक दिली असून, देशातील जनता खोट्या प्रचाराच्या नव्हे तर विकासाच्या मागे उभी राहाते या विजयाने दाखवून दिले आहे.
हरियाणामध्ये निवडणुकीच्या (Haryana Election) आधी अग्निवीर योजनेच्या विरोधात जाणीवपुर्वक वातावरण निर्माण केले गेले. खेळाडूना पुढे करून राजकारण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. यासर्व घटनांना हरियाणा तील जनतेन मतदानातून नाकारले आणि भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विकासाच्या राजकारणाला पाठबळ दिले असल्याकडे मंत्री विखे पाटील यांनी लक्ष वेधले. जम्मू काश्मिरमध्ये (Jammu and Kashmir) पुन्हा एकदा लोकशाही प्रक्रीयेला या निवडणुकीच्या निमिताने बळकटी मिळाली असून, अतिशय भयमुक्त वातावरणात निवडणूक प्रक्रीया पार पाडल्याचा सकारात्मक संदेश संपूर्ण जगामध्ये गेला आहे.
370 कलम रद्द केल्यानंतर कश्मिरमध्ये (Jammu and Kashmir) रक्ताचे पाट वाहतील असे वातावरण करणार्याना सुध्दा आजच्या निकालाने उतर मिळाले असल्याचे विखे पाटील म्हणाले. हरियाणाच्या विजयामुळे तसेच जम्मू काश्मिरमध्ये (Jammu and Kashmir) मिळालेल्या यशामुळे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढला असून आजचा विजय म्हणजे लोकांसाठी अधिकचे काम करण्यासाठी मिळालेली उर्जा असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.