Thursday, February 12, 2026
HomeनगरAccident News : हायवाच्या धडकेत बारा वर्षीय मुलाचा मृत्यू

Accident News : हायवाच्या धडकेत बारा वर्षीय मुलाचा मृत्यू

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील सायखिंडी येथील रस्त्यावरून चिकणीकडे पायी जात असलेल्या बारावर्षीय मुलाला भरधाव हायवा वाहनाने पाठीमागून जोराची धडक (Hayva Truck Hit) दिल्याने त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला. ही घटना बुधवारी (दि.11) दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली. अपघातात (Accident) मृत झालेल्या मुलाचे नाव समाधान विश्वनाथ मोहिते असे आहे.

- Advertisement -

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समाधान मोहिते (मूळ रा. नायकरवाडी, मुथाळणे, ता. अकोले) हा सध्या चिकणी येथे राहत होता. बुधवारी दुपारी तो सायखिंडी रस्त्याने चिकणीकडे पायी जात असताना विनाक्रमांकाच्या हायवा वाहनावरील अज्ञात चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून त्याला पाठीमागून जोराची धडक (Hit) दिली. या अपघातात समाधानचा जागीच मृत्यू (Death) झाला. घटनेनंतर समाधानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी येथे आणण्यात आला.

YouTube video player

या घटनेची माहिती गावात पसरताच बुधवारी रात्री मुलाच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी तालुका पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली. संबंधित चालकाला तातडीने पोलीस ठाण्यात हजर करावे, अशी मागणी संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्याकडे केली. याप्रकरणी पवन काशिद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अज्ञात हायवा वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक फौजदार बन्सी टोपले करत आहेत.

ताज्या बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीला मुदतवाढ नाही – सामान्य प्रशासन विभागाचे आदेश जारी

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदलीला यापुढे मुदतवाढ न देण्याचा किंवा त्यांची बदली रद्द न करण्याची भूमिका सामान्य...