Sunday, June 14, 2026
HomeनाशिकNashik Crime : घरफोडीत सुमारे ७ लाखांचा ऐवज लंपास

Nashik Crime : घरफोडीत सुमारे ७ लाखांचा ऐवज लंपास

इंदिरानगर | वार्ताहर | Nashik

घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी गौळाणे परिसरातील एका घरात घरफोडी (Burglary) करत सुमारे ७ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगनाथ अर्जुन मोरे (रा. पांडव वन, गौळाणेपाथर्डी रोड, नाशिक) हे सेवानिवृत्त असून ते पत्नी, मुलगा व सुनेसह राहतात व शेती व्यवसाय करतात.

- Advertisement -

दि. ६ फेब्रुवारी रोजी मोरे कुटुंबीय निफाड (Niphad) येथे शेतीच्या कामानिमित्त गेले होते. दि. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना बेडरूमचा दरवाजा उघडा व घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आले. चोरट्यांनी घराच्या आढ ळून खिडकीचे लोखंडी गज कापून काच फोडत घरात प्रवेश केला होता.

बेडरूममधील लाकडी कपाट फोडून त्यातील सुमारे १६ तोळे सोन्याचे विविध दागिने व ६० हजार रुपये रोख असा एकूण ६ लाख ८३ हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेण्यात आला. या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात (Police Station) करण्यात आली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

महिला टी-20 विश्वचषक २०२६ : भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय

0
महिला टी-20 विश्वचषक २०२६ मध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ६४ धावांनी शानदार विजय मिळवत स्पर्धेतील मोहिमेची दमदार सुरुवात केली. बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर झालेल्या या...