पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी Pimpalgaon Basvant
पिंपळगाव बसवंत येथे भर दिवसा एका इसमाच्या हातातून 15 लाख रुपये दोन चोरट्यांनी चोरी केल्याची खळबळ जनक घटना परिसरात घडली असल्याचे वृत्त चांगलेच व्हायरल झाले होते मात्र सदर वृत्त बनावट व खोटे असल्याचे पोलिसांच्या तत्परतेने अवघ्या तास भरातच उघडकीस आले. याबाबत बनावट घटनाक्रम सांगून पोलिसांची व नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या इसमा विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पिंपळगाव बसवंत येथील माथाडी युनियन मापारी गटाचे राकेश दिलीप बाविस्कर हे नेहमीप्रमाणे माथाडी कामगारांच्या मजुरीचे पैसे पंधरा लाख पंधरा हजार रूपये बँक ऑफ इंडिया चिंचखेड रोड शाखे मध्ये भरणा करण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात काहीतरी फेकून लूट केल्याचा बनाव त्यांनी केला व काही माथाडी कामगार यांना सांगीतले.
या बाबत तातडिने पोलिसांना कल्पना देण्यात आली आणि हा बनाव त्यांनी सदर पोलीस ठाण्यात सांगितला की दोन इसमाने डोळ्यात काहीतरी औषध फेकून 15 लाख रुपयांची रोकड पळवून नेली यानंतर पिंपळगाव पोलिसांनी सदर इसमाची चौकशी केली असता त्या इसमानेच बनाव केल्याचा प्रकार उघडीस केला.
यानंतर पोलिसांनी त्याला पोलिसांचा खाक्या दाखवताच सर्व घटनाक्रम यांनी सांगितले यादरम्यान सदर इसमाविरोधात लबाडीच्या उद्देशाने बनावट घटनाक्रम सांगून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात सदर इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच त्याच्या घरातुन पाच लाख पसतीस हजाराची रक्कम जमा करण्यात आली आहे.
या घटनेचा अधिक तपास पिंपळगाव पोलीस ठाण्याचेपिंपळगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीपघुगे, उपनिरीक्षक मच्छीन्द्र कोल्हे, किरण गांगुर्डे, पोलीस कर्मचारी गोकुळ खैरनार, अमोल देशमुख, विकास वाळुंज, नितीन गाढवे, सागर धात्रक, योगेश देवकर, संतोष शिंदे, आदींच्या पथकाने हा छडा लावला.
या प्रकरणी माथाडी कामगार यांचा आर्थिक व्यवहार हा अत्यंत प्रदर्शक पणे करणारा राकेश बावीस्कर होता, असा बनाव का केला पंधरा लाख पंधरा हजार रूपये भरणा करावयाची असता घरात पाच लाख पसतीस हजार रूपये होते, उर्वरीत रक्कम कुठे गेली यावर प्रश्न चिन्ह ऊपस्थित होत असून कुठलेही व्यसन नसलेल्या या व्यक्तीने असे का केले या मागचे कारण गुलदस्त्यात आहे.




