Sunday, November 24, 2024
Homeनगरआरोग्य विभाग दक्ष; कर्मचार्‍यांसह प्रथमोचार पेटी आणि औषध

आरोग्य विभाग दक्ष; कर्मचार्‍यांसह प्रथमोचार पेटी आणि औषध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर आणि शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी सामेवार (उद्या) मतदान होणार आहे. ऐन उन्हाळ्यात होणार्‍या मतदानादरम्यान मतदारांना उष्माघात, उष्णतेचा त्रास झाल्यास त्यांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानूसार जिल्ह्यातील दोनही लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर आरोग्य विभाग सज्ज राहणार आहे. यासाठी आवश्यक असणार्‍या औषधांसह प्रथमोचार पेटी आरोग्य कर्मचारी अथवा आशा सेविका यांच्यापैकी एकजण तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात पारा 41 अशांपर्यंत वाढलेला आहे. यामुळे उष्णतेत मोठी वाढ झालेली असून याचा परिणाम मतदानावर होवू नयेत, मतदारांना मतदान केंद्र परिसारात उष्माघातासह उष्णतेचा त्रास झाल्यास त्यांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी दोनही मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आरोग्य विभागाशी चर्चा करुन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी उष्माघात कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे.

यासह 3 हजार 700 च्या जवळास असणार्‍या मतदान केंद्रावर सर्व ठिकाणी आरोग्य सेवक पुरूष अथवा आरोग्य सेविका महिला, तसेच आशा सेविका यांच्यापैकी जे उपलब्ध होईल त्यांना तैनात करण्यात येणार आहे. त्यांच्याकडे ताप उष्णता कमी करणारी औषधे, ओआरएसची पावडर यासह प्रथमोचार पेटी ठेवण्यात येणार असून मतदान केंद्रात गरज भासल्यास आवश्यक असणारी सर्व तात्काळ प्रथमोचार आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश काढण्यात आलेेले असून तालुकास्तरावरील आरोग्य विभागाने नियोजन केलेले आहे. सुदैवाने दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे तपमानात घट झालेली असून यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे डॉ. नागरगोजे यांनी सांगितले.

मतदानाच्या दिवशी यलो अर्लट
भारतीय हवामान विभागाने नगर जिल्ह्यात 12 आणि 13 मे रोजी पावसाचा यलो अर्लट जारी केला आहे. आधी उष्णाचा तडाखा बसण्याची शक्यतागृहीत धरून निवडणूक विभागाने नियोजन केल्यानंतर आता अचानक जिल्ह्यात 13 मे (सोमवारी) पावसाचा यलो अर्लट जारी केला आहे. यामुळे मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी वादळी पावसचा अंदाज व्यक्त होत आहे.

170 रुग्णवाहीका सज्ज
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य स्तरावर, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि 108 यांच्या पातळीवर 170 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. यासर्व रुग्णवाहिला मतदानाच्या दिवशी सज्ज ठेवण्यात येणार असून निरोप येणार्‍या ठिकाणी त्या रवाना करून गरजवंतांना तात्काळ आरोग्य सेवा देण्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या