Sunday, May 19, 2024
Homeधुळेआरोग्य, पाणी, अतिक्रमणाच्या प्रश्नांवर लक्ष देणार

आरोग्य, पाणी, अतिक्रमणाच्या प्रश्नांवर लक्ष देणार

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरातील मूलभूत आणि महत्वाच्या समस्या मार्गी (Important issues) लावण्यासह आरोग्य आणि अतिक्रमणाच्या प्रश्नांवरही (Even on questions of encroachment) विशेष लक्ष दिले जाईल, अशी ग्वाही नवनिर्वाचित महापौर प्रदीप कर्पे (Newly elected Mayor Pradeep Karpe) यांनी दिली. दरम्यान विशेष महासभेत (special general assembly) कर्पे यांची महापौरपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

- Advertisement -

महापौर निवडीसाठी आज महापालिकेच्या भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी सभागृहात विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक प्रक्रिया पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सकाळी 11 वाजता निवडणुक प्रक्रियेला सुरुवात झाली. महापौरपदासाठी भाजपाचे प्रदीप कर्पे यांचा एकमेव अर्ज असल्याने छाननी आणि माघारीची औपचारीकत्ता पार पाडली गेली.

प्रदीप कर्पे यांना महापौर म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे पिठासन अधिकारी शर्मा यांनी जाहीर केले. बिनविरोध निवडीची घोषणा होताच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मनपा प्रवेशद्वाराबाहेर फटाक्यांची आतषबाजी केली. मनपाचे आयुक्त देविदास टेकाळे,स्थायी समिती सभापती शितल नवले,उपमहापौर अनिल नागमोते, बबन चौधरी आदींनी सत्कार केला.

यावेळी नगरसेवक बंटी मासुळे, सुनिल बैसाणे,अ‍ॅड.किशोर जाधव, हिरामण गवळी, संजय अग्रवाल, माधुरी बोरसे, वालीबेन मंडोरे, मायादेवी परदेशी, ओम खंडेलवाल, महादेव परदेशी, चेतन मंडोरे, बबनराव चौधरी, अण्णा खेमणार, जयेश मगर, अजिक्य धात्रक, भगवान देवरे, दगडू बागुल, राजेंद्र सोनार,सचिन शेवतकर, पवन जाजु आदी उपस्थित होते.

महापौर कर्पे म्हणाले की, पिण्याच्या पाण्याचा महत्वाच्या समस्या सोडविण्यावर आपला भर असेल. पाणी नियमित आणि वेळेवर कसे देता येईल याचे नियोजन लवकरच केले जाईल.त्याबरोबर आणखी काही समस्या देखील सोडविल्या जातील. सध्या धुळ्यात आरोग्य आणि स्वच्छतेचा प्रश्न बर्‍यापैकी मार्गी लागला आहे.

मात्र तरी देखील पावसाळ्यामुळे डास,मच्छरांचा प्रार्दूर्भाव झाला आहे त्यातून डेंग्यु मलेरियासारखे साथीचे आजार पसरु नये. यासाठी पावले उचलली जातील. फवारणी अ‍ॅबेटींग करण्यासाठी आदेश दिले जातील.शहराला अतिक्रमणाचा विळखा पडला असून अतिक्रमण विभागाशी चर्चा करुन अतिक्रमणे हटविण्यात येतील असेही ते म्हणाले.

भुमिगत गटारीचा ठेकेदाराला बोलवून त्याच्याकडून देवपुरातील गटारीचे काम आणि रस्त्यांचे काम करुन घेतले जाईल. राज्यात आता आपलीच सत्ता असल्याने धुळे शहराचा चौफेर विकास होण्यास मदत होईल असेेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या