Wednesday, February 4, 2026
HomeनगरAhilyanagar : 5 लाख 10 हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ahilyanagar : 5 लाख 10 हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

नुकसानीची माहिती आज संकलित होण्याचा अंदाज

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबर या दरम्यान झालेल्या पावसात 1 हजार 360 गावातील 8 लाख 37 हजार 955 शेतकर्‍यांचे 5 लाख 78 हजार 822 हेक्टरवरील खरीप हंगामातील पिके, फळबागा यांचे मोठे नुकसान झालेले आहे. यासह मनुष्यहानी, पशधनासोबत घरांचे, विहिरींचे, जनावरांच्या गोठ्याचे, शेतजमिनीसह अन्य शासकीय मालमत्ताचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू असून राज्य सरकारने बाधित शेतकर्‍यांना वाढीव नुकसान भरपाईसह भरपाईच्या निकाषात आणि रक्कमेत बदल केला आहे. दरम्यान, कृषी विभागाने जिल्ह्यातील 5 लाख 10 हजार हेक्टरवरील 90 टक्क्यांपर्यंत क्षेत्राचे पंचनाम्याचे काम पूर्ण केले आहे. उर्वरित बाधित शेती आणि क्षेत्राचे पंचनामे आज रविवार (दि.12) पूर्ण होवून नुकसानीची आकडेवारी अंतिम होण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली. यात 14 तालुक्यातील गावात कमी अधिक प्रमाणात त्याचा फटका बसलेला आहे. अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका पाथर्डी तालुक्याला बसलेला आहे. पाथर्डीच्या 137 गावात तर सर्वात कमी अकोले तालुक्यात 31 गावात जादाच्या पावसाने नुकसान झालेले आहे. अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील 100 टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत. तर सर्वात कमी पंचनामे पारनेर तालुक्यातील 130 गावातील 35 हजार 500 हक्टरवरील 59.46 टक्के झालेले आहेत. उर्वरित ठिकाणी पंचनाम्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे.

YouTube video player

दरम्यान, राज्य सरकारकडून पंचनामे आणि भरपाईपच्या निकषात काही बदल करण्यात आले. जिल्ह्यात राज्य सरकारच्या सुधारित निकषाप्रमाणे जादा हेक्टर क्षेत्र नावावर असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या कमी आहे. तसेच कृषी विभाग नुकसान झालेल्या शेतकर्‍याचे नाव, त्याचे क्षेत्र, पिकांचे 33 टक्के अथवा 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले याची खातजमा करणार आहे. जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या एकूण बाधित शेतकर्‍यांच्या शेतीच्या 90 टक्क्यांपर्यंत पंचनामे पूर्ण झालेले आहेत. आज रविवार (दि.12) पर्यंत एकूण बाधिता पिकांच्या पंचनाम्याची आकडेवारी अंतिम होणार असल्याचा अंदाज असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आतापर्यंत झालेले पंचनामे
नगर 51 हजार हेक्टर (91.5 टक्के), पारनेर 35 हजार 500 हेक्टर (59.46 टक्के), पाथर्डी 71 हजार 341 हेक्टर (92.46 टक्के), कर्जत 32 हजार 645 हेक्टर (100 टक्के), जामखेड 33 हजार 800 हेक्टर (98.47 टक्के), श्रीगोंदा 38 हजार 498 हेक्टर (100 टक्के), श्रीरामपूर 33 हजार 350 हेक्टर (94.49 टक्के), राहुरी 42 हजार 410 हेक्टर (95.22 टक्के), नेवासा 52 हजार हेक्टर (97.65 टक्के), शेवगाव 55 हजार 700 हेक्टर (91.77 टक्के), संगमनेर 9 हजार 100 हेक्टर (71.61 टक्के), अकोले 590 हेक्टर (66.73 टक्के), कोपरगाव 22 हजार (66.59 टक्के) आणि राहाता 29 हजार 356 हेक्टर (73.24) टक्के पंचनामे झालेले आहेत.

या पिकांचे नुकसान
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यांत झालेल्या पावसात काढणीत सोयबीन, ऊस, तूर, मूग, उडिद, सुर्यफूल, मका, कापूस, बाजरी, केळी, फुलपिके, लिंबू, कांदा, भाजीपाला या पिकांचे 50 टक्क्यांच्या जवळपास नुकसान झालेले आहे.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...