Saturday, April 26, 2025
HomeनाशिकRain News : नाशकात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची 'जोर'धार; नागरिकांची तारांबळ

Rain News : नाशकात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची ‘जोर’धार; नागरिकांची तारांबळ

नाशिक | Nashik

काल नाशिक शहरात (Nashik City) दुपारच्या सुमारास अवघ्या तासभर आलेल्या पावसामुळे शहरातील ठिकठिकाणचे रस्ते जलमय झाले होते. या मुसळधार पावसामुळे (Rain) मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने शहरातील विविध भागांत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Rain News : अवघ्या तासाभराच्या पावसाने नाशिकमध्ये रस्ते तुंबले

शहरातील मेनरोड, शालिमार, सीबीएस, जुने नाशिकसह आदी भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे जागोजागी रस्त्यांवर (Road) पाणी साचल्याचे दिसून आले. तर अचानक आलेल्या या पावसामुळे छत्री व रेनकोट न आणलेल्या नागरिकांनी (Citizen) पावसापासून लपण्यासाठी ठिकठिकाणी दुकानांच्या गाळ्यांचा आडोसा घेतल्याचे पाहायला मिळाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या